अमरावती- शहरासह जिल्ह्यातील लाख १२ हजार २११ शिधापत्रिकाधारकांची (रेशन कार्ड) आॅनलाइन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, येत्या तीन ते चार महिन्यांत अमरावतीकरांना स्मार्ट रेशन कार्डद्वारे धान्य वितरण केले जाणार आहे.या कार्डवर शिधापत्रिकाधारकांची माहिती अंकित केली जाणार असून, या कार्डद्वारे शिधापत्रिकाधारकाने किती कोणत्या प्रकारचे धान्य घेतले याची आॅनलाइन नोंद होणार आहे.त्यामुळे यापुढे धान्य वितरणामधील गैरप्रकारांना आपोआपच आळा बसणार आहे.
या कार्डवर राॅकेलही मिळणार आहे. केवळ ज्यांच्याकडे दोन सिलिंडर आहेत त्यांना मात्र राॅकेल मिळणार नाही, असा निर्णय आधीच घेण्यात आला आहे. दरम्यान, धारणी तालुक्यातील डिजिटल व्हिलेज हरिसाल येथे नुकतेच या स्मार्ट रेशन कार्डचे वाटप करण्यात आले आहे.
रेशन कार्डची आॅनलाइन प्रक्रिया सुरू झाल्यापासून अनेक बनावट रेशन कार्ड असल्याचे निदर्शनात आले. ते रद्द केल्यामुळे त्यामुळे जिल्ह्यातील रेशन कार्डधारकांची संख्या कमी झाली. परिणामी, आता गरजूंना त्यांच्या वाट्याला येणारे धान्य हमखास िमळेल. रेशन धान्य वितरण प्रणालीत पारदर्शकता हाच या प्रणालीचा फायदा आहे. राज्यात रेशन कार्डचे आधार कार्डशी लिंकिंगचे प्रमाण ८३ टक्के आहे. जिल्ह्यात रेशन कार्डची आधार कार्डशी लिंक केल्यामुळे ११ टक्के रेशन कार्ड अपात्र िकंवा अतिरिक्त ठरले आहेत. तंत्रज्ञानाचा वापर करून अन्नधान्य वितरणाच्या पद्धतीत सुसूत्रता, वेग पारदर्शका आणणे शक्य होणार आहे. लाभार्थ्यांच्या तक्रारीही दूर होतील.
स्मार्टरेशन कार्डमध्ये असेल मायक्रोचिप : स्मार्टरेशन कार्डमध्ये मायक्रोचिप राहणार असून त्यात शिधापत्रिकाधारकाची माहिती राहणार आहे. या कार्डची लिंक आधार कार्डशी जोडली जाणार असल्यामुळे दोन्हीमधील माहितीत शत प्रतिशत साधर्म्य असेल. त्यामुळे बनावट कार्ड तयार करणाऱ्यांचे काहीच फावणार नाही.
असेअसेल स्मार्ट रेशन कार्ड : स्मार्टरेशन कार्डच्या एका बाजूला तिरंग्याच्या रंगाचे राहणार आहे. वरच्या बाजूला अन्न, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग असे लिहिले असेल. मध्यभागी जिल्हा, तहसील गावाचे नाव आणि राजमुद्रा खाली स्मार्ट रेशन कार्ड असे लिहिले असेल.
गिरीश बापट, अन्नपुरवठा मंत्री.
बनावट कार्डची संख्या घटेल
नागरिकांना स्मार्टरेशन कार्ड दिले जाणार असल्यामुळे निश्चितपणे जिल्ह्यातील बनावट रेशन कार्डची संख्या घटण्यास मदत होणार आहे. हे स्मार्ट कार्ड मिळण्यास दोन किंवा तीन महिने लागू शकतात. शासन लागू करेल त्या वेळी कार्ड शिधापत्रिकाधारकांच्या हाती येईल. डी. के. वानखेडे, जिल्हापुरवठा अधिकारी.
गैरव्यवहारांना आळा
संपूर्णराज्यामध्येच आता स्मार्ट रेशन कार्ड दिले जाणार आहेत. यामुळे रेशनच्या धान्यासंदर्भातील गैरव्यवहारांना आळा बसण्यास मदत होणार आहे. त्यामुळे जे गरजू आहेत त्यांना धान्य मिळेल.
११% रेशन कार्डची आधार कार्डशी लिंक केल्यानेे ११ टक्के रेशन कार्ड अपात्र ठरले.
तालुकानिहाय शिधापत्रिका-धारक शेतकरी लाभार्थी