आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकवर सुरू झाले तपाेवन अपडेट...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- अनेकांकडून विविध साधूंबराेबर फाेटाे काढून ते शेअर केले जात अाहेत. काहींनी तर संबंधित साधूंची माहिती घेऊन ती फेसबुकवर टाकण्याचे कामही सुुरू केले अाहे.

यंदाचा सिंंहस्थ साधू-महंत अाणि भाविकांबराेबर तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्यांसाठीदेखील पर्वणीस्वरूप ठरणार अाहे. या सिंहस्थात विविध अॅप्लिकेशन्स अाणि तत्सम तंत्रज्ञानाचा माेठ्या प्रमाणात वापर केला जात अाहे. गेल्या सिंहस्थ काळात साेशल मीडियाचा फारसा प्रभाव नव्हता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून साेशल मीडियाचा जनमानसावरील प्रभाव प्रचंड वाढला अाहे. त्यामुळे सिंहस्थातही या प्रभावाची प्रचिती येणे साहजिकच ठरले अाहे. तपाेवनात साधू-महंतांचे आगमन सुरू हाेताच अनेकांनी त्यांना कॅमेऱ्यात बंदिस्त करीत संबंधित फाेटाे फेसबुकवर अपडेट करणे सुरू केले अाहे.

..हे ठरतेय लक्षवेधी
सोशलमीडिया यूजर्सकडून केल्या जाणाऱ्या फोटो शेअरिंगमध्ये साधूंच्या विविध भावमुद्रा,वैशिष्ट्यपूर्ण दाढी, जटा यांचे क्लाेजअप शाॅट विशेष लक्षवेधी ठरत अाहेत. याशिवाय, साधू-महंतांकडून आयोजित केल्या जाणाऱ्या भाेजनावळींचे फाेटादेखीले अपलाेड करण्यात येत अाहेत. साधूंची जीवनशैली कशी असते, हेदेखील या माध्यमाद्वारे दर्शविण्यात येत अाहे.
बातम्या आणखी आहेत...