आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचनालयाचा आता व्हावा शाखाविस्तार...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहराचा विस्तार वाढत अाहे. मात्र, सार्वजनिक वाचानालयाची एकही शाखा नव्याने निर्माण झालेली नाही. शहरातील उपनगरांमध्ये वाचनालयाचा शाखाविस्तार व्हावा, अशी महत्त्वपूर्ण सूचना ‘सावाना’च्या वाचक मेळाव्यात अनेक वाचकांनी केली. मात्र, ते तांत्रिक कारणाने शक्य नसून, त्याएेवजी परिसंवाद, व्याख्याने अायाेजित करता येतील, असा खुलास ‘सावाना’चे कार्यवाह मिलिंद जहागीरदार यांनी केले. वाचकांनी विविध सूचना मांडल्या, त्या अशा...
राकेशवानखेडे : नाशिकच्यालेखकाला वा पहिले प्रकाशन असलेल्या व्यक्तीला भाड्यात सवलत द्यावी.

श्रीकांत काळे : वाचनालयाचातालुक्यांत शाखा विस्तार व्हावा. ‘सावाना’चे अॅप असावे.
रवीमहाजन : माॅलप्रमाणेपुस्तके घेता यावीत. स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करावे. डिजिटलायजेशनचा विचार व्हावा.

देवेंद्र पण्ड्या : ‘सावाना’तअसलेली दुर्मिळ नियतकालिके वाचकांना उपलब्ध करून द्यावीत.
राजेंद्रसिन्नरकर : अनुभवसमृद्ध करणारी याेगा, ताणतणाव अशी पुस्तके असावीत. वाचक कट्टा असावा.

प्रमाेद पुराणिक : शहरातीलउपनगरांमध्ये विविध मार्गदर्शनपर कार्यक्रम घ्यावेत.
मुकुंदबेणी : अखिलभारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष व्हावे. संमेलनासाठी निमंत्रण द्यावे.

यशवंत पाटील : तरुणांचाअाेढा वाढेल असे उपक्रम सुरू करावेत. ज्येष्ठ नागरिक मंडळांमध्ये कार्यक्रम घ्यावेत.
विनायक जाेशी : उत्कृष्टग्रंथपालांचा, कार्यकर्त्यांचा सत्कार करावा. नाशिकच्या लेखकांची सूची करावी.

..यांनीही मांडल्या सूचना : दिलीपमहाले, रमेश कडलग, राम पाठक, चंद्रकांत महामिने, प्रशांत पाटील आदी.

पुढील महिन्यापासून ‘सावाना एेसपैस गप्पा’ : पुण्यातील‘मॅजेस्टिक गप्पा’ किंवा मुंबईत ‘अत्रे कट्टा’ या धर्तीवर ‘सावाना’त अाता ‘सावाना एेसपैस गप्पा’ हा उपक्रम दर महिन्याला सुरू हाेणार अाहे. महिन्याच्या पहिल्या शनिवारी किंवा रविवारी हा कार्यक्रम हाेईल. पुढील महिन्यात या कार्यक्रमात दत्ता सराफ सहभागी हाेतील.‘सावाना’तर्फे नाट्य लेखकांची सूची सूची करण्यात येत असल्याची माहिती नाट्यगृह सचिव सुरेश गायधनी यांनी दिली.

सूचनांवर कार्यवाह यांचे उत्तर
सगळ्यासूचना उपयुक्त अाहेत. नाट्यगृह सुधारण्याच्या अाराखड्याचे काम सुरू अाहे. पण, अाधीच्या कामांचा हिशेब लावण्याचे काम सुरू असल्याने येत्या दाेन-तीन महिन्यांत अांतरभागातही सुधारणा सुरू हाेतील. ‘सावाना’चा शाखाविस्तार करणे तसे तांत्रिकदृष्ट्या अवघड अाहे. त्याएेवजी विविध भागांत व्याख्याने, परिसंवाद अायाेजित करू शकताे. नाट्ययज्ञाप्रमाणे कलायज्ञ घेण्याचा विचार अाहे. साहित्य संमेलनासाठी निमंत्रणाचा विचार अाहेच, पण काेणत्याही राजकीय टेकूशिवाय संमेलन व्हावे, अशी अपेक्षा अाहे. मातृभाषा शिक्षण परिषद अापण घ्यायला हवी, असाही पदाधिकाऱ्यांचा विचार असल्याचे कार्यवाह जहागीरदार यांनी स्पष्ट केले.