आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृदयरोग उपचारांसाठी आता हाप्त्याची सुविधा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- भारतात हृदयरोगासारख्या आजाराने दरवर्षी 30 लाख लोकांचा बळी जातोय. केवळ उपचार महागडे असल्यानेच बळींची संख्या इतकी जास्त आहे. यावर उपाय म्हणून आता काही वैद्यकीय उपकरणे तयार करणा-या कंपन्या आता पुढे सरसावल्या आहेत. यात महागड्या उपचारांसाठी ईएमआयमार्फत खर्च करण्याची योजना पुढे येत आहे. याबाबत एका कंपनीने शहरातील काही हॉस्पिटल्सकडे चाचपणीही केली आहे तर काही हॉस्पिटलमध्ये अशी योजना सुरूही आहे. या योजनेमुळे रुग्णांना उपचारानंतर मासिक हप्त्याने उपचार खर्च जमा करणे शक्य होत आहे.
दक्षिणेतील बंगलोर आणि म्हैसूर या दोन शहरांत फोर्टीस आणि विक्रम या नामांकित रुग्णालयांनी अशी योजना सुरू केली आहे. त्यासाठी एचएचएफए ( हेल्दी हार्ट फार ऑ ल) कार्यक्रमाचा आधार घेण्यात आला असून हा कार्यक्रम भारतीय स्टेंट उत्पादक कंपनी इंडियन मेडीट्रॉनिकशी संलग्न आहे. मेडिकल टुरिझमसाठी वेगाने प्रसिद्धीस येत असलेल्या नाशिकमध्ये ही योजना लागू होऊ शकते.

सध्या एका कंपनीने नाशिकमध्ये कामही सुरू केले आहे. या कंपनीच्या प्रस्तावात काही बदल केला गेला किंवा स्पर्धेच्या युगात एखाद्या कंपनीकडून नव्या स्वरूपातील ही योजना सादर केली तर ही नवी योजना बहुतांश रुग्णालयांत सुरू होण्याची शक्यता डॉक्टर्स व्यक्त करीत आहेत.

अशी आहे योजना

‘एचएचएफए’कडून (हेल्दी हार्ट फार ऑ ल) रुग्णांना व्हॉल्व्ह, स्टेंट बदलणे यांसारख्या उपचारांकरिता कर्ज उपलब्ध करून दिले जाते. बिनव्याजी सहा ते नऊ हप्त्यांत हे कर्ज फेडता येते. 7 वर्षांच्या परतफेड कालावधीसाठी मात्र 8.25 टक्के दराने व्याजाची आकारणी होते.

नव्या योजना स्वीकारू
स्टेंट, व्हॉल्व्हसाठीचा खर्च कर्जरूपात देण्याचा कंपनीचा प्रस्ताव होता. मात्र उपचार, औषधे यांचा खर्च ग्राहकांनाच करावा लागणार असल्याने तो नाकारला. नव्या स्वरूपात योजना आली तर स्वीकारू.
डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, नाशिक

रुग्णांना काहीसा दिलासा
या योजनेअंतर्गत एकावर शस्त्रक्रिया झाली आहे. मेडीट्रॉनिक कंपनीची ही योजना आहे. रुग्ण-कंपनी यांतच कर्जाबाबतचा करार होतो. उपचारात काही अंशी दिलासा मिळतो.’’
हुल कैचे, हृदयरोगतज्ज्ञ, वोक्हार्ट हॉस्पिटल