आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टेम्पो-व्हॅन अपघातात तीन विद्यार्थी गंभीर जखमी, वडाळारोडवर ‘रास्ता रोको’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुने नाशिक - वडाळरोड येथील हॉटेल साईप्रथमसमोर विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी ओम्नी सर्व्हिसरोडवर थांबली असता, एका टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात नऊ जण जखमी झाले. यातील तीन विद्यार्थी व चालक गंभीर आहेत. गुरुवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास अपघात घडला.

द्वारका चौकातून मुंबई नाक्याकडे वेगाने जाणार्‍या टेम्पोने (एमएच 15, डीके 294) रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या मारुती ओम्नीला (एमएच 02 वी 9189) धडक दिली. यात सैफ अन्वर अली सय्यद (वय 9), कुरेशी अफजल खालीद (13), सना महसाना खान (11), लुबना एहसान खान (12) हे विद्यार्थी गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरीकांनी जखमींना मेट्रो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. फोन करूनही पोलिस घटनास्थळी न पोहोचल्याने संतप्त नागरीकांनी दोन तास ‘रास्ता रोको’ केला. यानंतर पोलिस दाखल झाले. यानंतर टेम्पोचालक राजेंद्र अविनाश जाधव (रा. पेठरोड) याच्यावर भद्रकाली पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.

राजकीय पक्षांकडून निवेदन : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल व वाहतूक शाखेचे सहाय्यक आयुक्त संजय ठाकूर यांना निवेदन देऊन वडाळारोड परिसरात सिग्नल यंत्रणा व पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी केली. शिक्षण मंडळ सदस्य संजय खैरनार यांनी सारडा सर्कल येथे प्रस्तावित फ्लायओव्हरच्या कामास त्वरित सुरुवात करावी; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा खैरनार यांनी दिला.