आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात नर्सिंग कॉलेजला घरघर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नर्सिंगच्या अभ्यासक्रमासाठी सीईटीचे बंधन व समाज कल्याण विभागाकडून शिष्यवृत्ती मिळत नसल्याने राज्यातील सुमारे 40 हजार विद्यार्थी दरवर्षी गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि केरळ या राज्यात शिक्षणासाठी जात आहे. राज्यातील नर्सिंग महाविद्यालयात 11 हजारांपैकी केवळ तीन हजार जागांवर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, तर उर्वरित आठ हजार जागा रिक्त आहेत. भविष्यात अशीच स्थिती राहिली तर राज्यातील नर्सिंग कॉलेज बंद पडण्याची शक्यता आहे. राज्य शासन, आरोग्य विद्यापीठ व प्रवेश नियंत्रक समिती, मुंबई यांच्या आडमुठय़ा धोरणाचा हा परिपाक आहे. राज्यात नर्सिंग अभ्यासक्रमाच्या 11 हजार 600 जागा आहेत. त्यापैकी आठ हजार रिक्त आहेत. कर्नाटकात 56 हजार जागा असून, त्या पूर्णपणे भरल्या आहेत.

प्रवेश घेताना मान्यतेची खातरजमा करा
कॉलेजला इंडियन व महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल आणि राज्य शासनाची मान्यता असल्याची खातरजमा करूनच प्रवेश घ्यावा. डॉ. ज्ञानेश्वर थोरात, सह्याद्री सेवा संस्था इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग

विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित
शिवाजी मोघे हे सामाजिक न्यायमंत्री झाल्यापासून नर्सिंगचे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहात आहे. -मनोज कदम, उपाध्यक्ष, प्रायव्हेट नर्सिंग कॉलेज मॅनेजमेंट असोसिएशन

नकारात्मक भूमिका
आरोग्य विद्यापीठाच्या नकारात्मक भूमिकेमुळे भविष्यात विद्यापीठाला याची किंमत मोजावी लागणार आहे. डॉ. बाळासाहेब पवार, सदस्य महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ