आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घातक नायलाॅन मांजाने चिरला शिक्षिकेचा गळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दुचाकीने जाणाऱ्या एका शिक्षिकेचा गळा नायलाॅन मांजाने कापला जाऊन त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर सुमारे दाेन तास शस्त्रक्रिया करून गळ्याला ४० टाके घालण्यात अाले. संक्रांतीच्या दाेन दिवस अाधी बुधवारी (दि. १३) हा प्रकार घडला. श्रद्धा गाेपाळ राठाेड (वय ३४, सहदेवनगर, गंगापूरराेड) या सायंकाळी पाचच्या सुमारास हाेरायझन स्कूलसमाेरून दुचाकीने शाळेतून घरी जात असताना नायलाॅनचा मांंजा त्यांच्या गळ्यात अडकला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे त्या दुचाकीवरून पडता पडता वाचल्या. मात्र, या घटनेत त्यांचा गळा तीन इंच खाेलवर कापला गेला. तेथे उपस्थित नागरिक मदतीस धावून अाले. घरी फाेन केल्यावर त्यांचे पती गाेपाळ राठाेड त्वरित अाले जखमी पत्नीला तातडीने उपचारासाठी काॅलेजराेडवरील एका खासगी रुग्णालयात दाखल केले.

त्यांच्यावर तातडीने उपचार करणारे डाॅ. नीलेश पाटील यांनी यावेळी राठाेड यांचे प्राण सुदैवानेच वाचल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. डाॅ. राहुल पाटील, डाॅ. राहुल पगार, डाॅ. अनिल निकम डाॅ. व्यंकटेश्वर पाटील यांनी शस्त्रक्रियाप्रसंगी अावश्यक वैद्यकीय सहकार्य केले.