आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवघेण्या नायलाॅनची छुपी विक्री अन‌् वापरही सुरूच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जीवघेणा ठरणाऱ्या नायलाॅन मांजामुळे हाेणारे अपघात लक्षात घेता त्याच्या प्रतिबंधासाठी सर्वांनी पुढाकार घेतल्यानंतर निव्वळ पाेलिसांच्या दुर्लक्षामुळे शहरातील रविवार कारंजा, अशाेकस्तंभ, जुने नाशिक, पंचवटी, सिडकाे सातपूर या भागात छुप्या पद्धतीने मांजाची विक्री सुरूच असल्याची बाब ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समोर आली आहे. जास्त किमतीत नायलाॅन मांजाची विक्रेत्यांनी बिनधास्तपणे विक्री सुरूच ठेवल्याचे अनेक ठिकाणी निदर्शनास समोर आले अाहे. त्यावर ‘डी. बी. स्टार’ने टाकलेला हा प्रकाशझाेत... 
 
संक्रांतीचासण ताेंडावर अाल्यामुळे मांजा खरेदीसाठी बाजारात लगबग सुरू झाली अाहे. प्रतिस्पर्ध्याची पतंग कापण्यासाठी धारदार मांजा म्हणून नायलाॅनला मागणी अधिक असून त्याचे दुष्परिणाम ज्यांना माहीत अाहे, त्यांनी मात्र पतंग उडवण्यासाठी साध्या मांजाची निवड केली अाहे. परंतु, माेठ्या प्रमाणात नायलाॅनचे दुष्परिणाम माहीत नसलेला वर्ग असून त्यांच्याकडून मात्र नायलाॅनचीच मागणी हाेत अाहे. अशावेळी नायलाॅन प्रतिबंधित असल्याचे सांगण्याचे साेडून विक्रेत्यांकडून त्याची विक्री सुरूच ठेवली अाहे. पाेलिसांकडून निव्वळ नावाला नायलाॅनवर बंदी घातल्याचा दावा केला जात असला तरी, छुप्या पद्धतीने विक्रेत्यांवर नजर ठेवली गेलेली नाही. परिणामी उघडपणे बाजारपेठेत मांजा विक्री सुरू असल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समोर आले आहे. 
 
दिव्य मराठी अभियान 
{ नायलाॅनच्या मांजाला बंदी असूनही शहरात माेठ्या प्रमाणात या मांजाची विक्री होत असल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर अापल्या विभागाकडून काय कारवाई केली जाणार? 
-नायलाॅनच्या मांजाविषयी माहिती घेतली जात आहे. ज्याही ठिकाणी नायलाॅनच्या मांजाची विक्री होत असेल अशा ठिकाणी तातडीने कडक कारवाई केली जाईल. अशा विक्रेत्यांना दंडात्मक कारवाईला सामाेरे जावे लागेल. 
{नायलाॅनच्या मांजावर बंदीसाठी अापल्याकडून कडक उपाययोजना का केल्या जात नाहीत? 
-नायलाॅनच्या मांजा विक्री त्याच्या वापराविरोधात पोलिस प्रशासनाकडून कडक मोहीम राबविली जाणार आहे. 
{नायलाॅन मांजाचा वापर विक्रीविरोधात अाता तीव्र मोहीम राबवणार अाहात, ती कशी? 
-नायलाॅनच्या मांजाविरोधात मोहीम उद्यापासून म्हणजे मंगळवारपासूनच सुरू केली जाईल आणि संक्रातीपर्यंत ती सुरू राहील. या मोहिमेत शहरातील सर्व दुकानदारांची तपासणी केली जाईल. 
 
कारवाई सुरू.. मग विक्रेत्यांकडे मांजा येताे कसा? 
शहरात पाेलिसांकडून कडक तपासणी सुरू असून, दंडात्मक कारवाईदेखील केली जात असल्याचे सांगण्यात येते. मग, या मांजाची विक्री कशी हाेत अाहे अाणि पतंग उडवणाऱ्यांकडे हा जीवघेणा मांजा येताे तरी कसा, हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच अाहे. यामुळे पाेलिसांकडून प्रभावी कारवाई हाेत नसल्याचेही अधाेरेखित हाेत अाहे. 

मनुष्य, पक्ष्यांसह पर्यावरणालाही घातक.. 
^चायनामेड असलेल्या नायलाॅनच्या मांजामुळे देशात पक्ष्यांबरोबरच माणसांचाही जीव गेल्याच्या असंख्य घटना अाहेत. या मांजामुळे देशातील पक्ष्यांची संख्याही कमी होत चालली आहे. या मांजामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. -अॅड. मझहर शेख, नागरिक 

घातक नायलाॅन मांजावर बंदी गरजेचीच.. 
^नायलाॅनच्यामांजामुळेदरवर्षी लाखो पक्ष्यांचे जीव जातात. यामुळे अनेकदा जीवितहानीही झाली आहे. यामुळे या घातक नायलाॅनच्या मांजावर पाेलिसांनी कडक बंदी घालणे अत्यंत गरजेचेच आहे. -सागर बेदरकर, नागरिक 

रुपयांचा माेनाेकाइट गट्टु 
नायलाॅनधागा हा प्रामुख्याने ज्वेलरी मेकिंग, ड्रेस मटेरियलवर एम्ब्राॅयडरी करण्यासाठी वापरला जाताे. या नायलाॅन धाग्यावर काचेचा वापर करून रासायनिक प्रक्रिया केली जाते. त्यानंतर धाग्याचे रूपांतर हे नायलाॅन मांजामध्ये हाेते. हा धागा खराब हाेत नसल्याने अाणि लवकर तुटत नसल्याने मकरसंक्रांतीमध्ये पतंगांची काटाकाटी करण्यासाठी ताे वापरला जाताे. 

महिनाभरापूर्वीच नाशकात दाखल झाला मांजा 
नायलाॅन मांजाच्या विक्रीवर बंदी घालण्यात अाल्याने तसेच पाेलिसांकडून संक्रांतीच्या काही दिवस अाधीच हाेणारी कारवाई लक्षात घेता काही दुकानदारांनी गेल्या दोन ते तीन महिन्यांपूर्वीच शहरात छुप्या मार्गाने माेठ्या प्रमाणावर नायलाॅन मांजा आणल्याची माहिती एका दुकानदाराने ‘डी. बी. स्टार’कडे दिली. भद्रकाली परिसरातील दूधबाजार, सिडको, रविवार कारंजा परिसरात माेठ्या प्रमाणात हा मांजा साठवून ठेवण्यात अाल्याची माहितीही ‘डी. बी. स्टार’ला एका दुकानदाराने खासगीत दिली अाहे. त्यांच्यावर कारवाईची प्रतीक्षा अाहे. 

खबरदारीचा उपाय म्हणून मांजासाठी नायलॉन दोरानिर्मिती, विक्री वापर यावर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर भारतीय दंडसंहिता - १९६० या कायद्याच्या कलम १८८ प्रमाणे कारवाई केली जाणार अाहे. असे असतानादेखील नायलाॅन मांजाविक्रेत्यांवर वचक ठेवण्यात पाेलिसांना अपयशच येत असल्याचे अातापर्यंतच्या घटनांवरून दिसून आले आहे. 

असे अाहेत मांजाचे प्रकार 
मुंबईसहिदल्ली, बंगळुरूमध्ये नायलाॅन धाग्यापासून नायलाॅन मांजा माेठ्या प्रमाणात तयार केला जाताे. येथूनच हा मांजा छुप्या मार्गाने शहरात येत असून जीवघेण्या नायलाॅन मांज्याचे विविध प्रकार बाजारपेठेत उपलब्ध असल्याचे दिसून येत अाहेत. यात माेनाेकाइट, माेनाेफिल, माेनाेगाेल्ड अादी कंपन्यांचे खाेटे स्टिकर्स चिकटवून या घातक ठरणाऱ्या नायलाॅन मांजाची सर्रासपणे विक्री हाेत असल्याचे ‘डी. बी. स्टार’ने केलेल्या पाहणीत समाेर अाले अाहे. 

बंदीमुळे नायलाॅन मांजाचे दरही वधारले... 
नायलाॅनच्यामांजाला बंदी असूनही माेठ्या प्रमाणात मागणी अाहे. नायलाॅन मांजा बंदीचा गैरफायदा विक्रेत्यांकडून घेतला जात आहे. नायलाॅन मांजाच्या दरातही मोठ्या प्रमाणावर वाढ करून बाजारात सर्रास विक्री केली जात आहे. बंदी असताना एका गट्टूची किंमत तब्बल सहाशे ते हजार रुपयांपर्यंत गेल्याची माहिती ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समोर आली आहे. 

अशी होत आहे विक्री 
नाशिक शहरातील दूधबाजार, द्वारका, रविवार कारंजा, सिडकाे भागात ‘डी. बी. स्टार’ने पाहणी केली असता या ठिकाणी असलेल्या पतंग दुकानांमध्ये नायलाॅन मांजाच्या विक्रीवर बंदी असल्यामुळे यंदा मांजा मिळणार नसल्याचे सांगण्यात आले. तर काही ठिकाणी नायलाॅन मांजा विकणारच नसल्याचे नमूद केलेले फलक लावण्यात अाले अाहेत. त्यानंतर डमी ग्राहक म्हणून विचारणा केली असता काहींनी नायलाॅन मांजा देऊ मात्र, त्याचे जास्त पैसे द्यावे लागतील, असे सांगितले. एका गट्टूसाठी तब्बल ८०० रुपयांची मागणी करण्यात अाली. जानेवारीत तर १५०० ते १७०० रुपयांना एक गट्टू इतका प्रचंड भाव राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...