आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाॅनलाइन दत्तक प्रक्रियेवर अाक्षेप, हायकाेर्टात जनहित याचिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सेंट्रल अॅडाॅप्शन रिर्साेस अॅथॉरिटीच्या (कारा) मार्गदर्शक तत्त्वानुसार अॅडाॅप्शनची (दत्तक घेणे) प्रक्रिया अाॅनलाइन झाल्यानंतर अाता अॅडाॅप्शनचा वेळ कमी हाेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असतानाच, फेडरेशन अाॅफ अॅडाॅप्शन एजन्सीने या प्रक्रियेलाच अाव्हान देणारी जनहित याचिका साेमवारी मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली अाहे. या याचिकेवर १७ नाेव्हेंबरला सुनावणी हाेणार अाहे. अाॅनलाइन प्रक्रिया कागदाेपत्री साेपी अाणि अादर्श वाटत असली तरी ती राबवणारे पालक अाणि संस्थांसाठी अतिशय किचकट अाहे, हाही याचिका दाखल करण्यामागील प्रमुख अाधार अाहे.

एक अाॅगस्ट २०१५ पासून अॅडाॅप्शनची प्रक्रिया अाॅनलाइन झाली अाहे. त्यासाठी ‘कारा’ने स्वतंत्र पाेर्टल तयार केले असून, त्यात मुलाची माहिती अाणि छायाचित्र दिसू शकतात. यात सहा मुलांची माहिती दिली जाते. प्रतीक्षा यातीतून संबंधित पालकाची निवड हाेते. त्यानंतर ४८ तासांच्या अात ‘कारा’ला निर्णय कळवणे गरजेचे असते. अशा पद्धतीने दत्तक घेण्याची प्रक्रिया भारतात प्रथमच राबवण्यात येत असल्याने प्रारंभिक पातळीवर पालकांना अनेक अडचणींना सामाेरे जावे लागत अाहे. काहींनी तर अर्ध्यातच ही प्रक्रिया साेडली असून, मूल स्वीकारण्याचा निर्णयही बदलला अाहे.

या प्रक्रियेत अनेक दाेष असल्याचे सांगत फेडरेशन अाॅफ अॅडाॅप्शन एजन्सीने जनहित याचिका दाखल केली अाहे. या फेडरेशनमध्ये महाराष्ट्रातील सुमारे २० संस्थांचा सहभाग अाहे.

याचिकेतील प्रमुख प्रश्न
> प्रत्येक भारतीयाला संगणकाचा वापर करता येत नाही. अशा वेळी सर्वच जण अाॅनलाइन अर्ज कसे भरू शकतात?
> अाॅनलाइन प्रक्रिया किचकट अाणि वेळखाऊ अाहे. पालकांना त्यामुळे असंख्य अडचणींना सामाेरे जावे लागते अाहे त्याचे काय?
> किचकट प्रक्रियेमुळे अनेक पालकांची मानसिकता खालावून त्यांनी मूल अॅडाॅप्ट करण्याचाच निर्णय बदलला, अशा पालकांच्या मानसिकतेचे काय?
> सहा मुलांमधून एका मुलाची अगदी कमी कालावधीत निवड केली जाते. इतक्या कमी कालावधीत निवड करताना पालकांच्या मानसिकतेचे काय हाेत असेल?
> जी मुले विशेष काळजीची अथवा विकलांग अाहेत, त्यांचेही फाेटाे ज्यांना सर्वसामान्य सुदृढ बालक हवे अाहेत त्या पालकांना दाखवले जातात. विशेष काळजीच्या बालकांचे असे प्रदर्शन का?
> काैटुंबिक जिव्हाळा जपत अाजवर अॅडाॅप्शनची प्रक्रिया हाेत हाेती. हा जिव्हाळाच अाॅनलाइन प्रक्रियेमुळे संपला, त्याचे काय?
> प्रतीक्षा यादीत असलेल्या पालकांना मूल दाखवल्यापासून केवळ ४८ तासांच्या अात ते बाळ स्वीकारण्याचे निश्चित केले जाते. हा कालावधी अतिशय कमी नाही का?
> मूल बघून ते निश्चित करण्याचा १५ दिवस कालावधी कमी नाही का?
> एसएमएस अाणि ई-मेलद्वारे ही माहिती कळवण्यात येत असल्याने काही पालक प्रक्रियेपासून अनभिज्ञ
> बालकांच्या विशिष्टच वैद्यकीय तपासण्या करण्यात येतात. पालकांना अपेक्षित असलेल्या सर्वच तपासण्या का करू दिल्या जात नाहीत?
> भारतासारख्या देशात बारा ते अठरा तास लाईट जाते. इंटरनेटचा अॅक्सेस कसा घेणार?

..तर अॅडाॅप्शनचे प्रमाण कमी
>अॅडाॅप्शनची प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी अाॅनलाइन प्रक्रिया करण्यात अाली. प्रक्रियेचा उद्देश जरी स्वच्छ असला तरीही त्याप्रमाणे प्रक्रिया राबवणे अतिशय किचकट अाहे. या प्रक्रियेमुळे अॅडाॅप्शनचे प्रमाण कमी हाेऊ शकते.
सुनील अराेरा, अध्यक्ष, फेडरेशन अाॅफ अॅडाॅप्शन
बातम्या आणखी आहेत...