आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Occasion Of World Sparrow Day : Fighting For Sparrow\'s Nest

जागतिक चिमणी दिन : चिऊताईच्या हक्काच्या घरट्यांसाठी लढाई

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहरात चिमण्यांचा चिवचिवाट कमी होतो आहे अशी ओरड अनेक जण करतात; पण त्याच चिमण्यांचे वास्तव्य शहरात राहावे यासाठी झगडणारे फार थोडे. डॉ. चेतन जावळे हे त्यापैकीच एक.

चिमण्यांना वाचविण्यासाठी तयार घरटे करून देण्याचा त्यांचा छंद. यामुळे तब्बल चार हजार चिमण्या शहरात दिसत असतील, असा विश्वास ते व्यक्त करतात.

हिरवळ फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकर्‍यांसाठी काम करताना पिकांवरील कीटकांचा प्रश्न पुढे आल्याने यावर उत्तर शोधताना त्यांनी चिमणीचा आधार घेत चिमणीलाच आधार दिला. चिमणी तिच्या नेस्टींगच्या काळात किडे खाते.

त्यामुळे यावर डॉ. जावळे यांनी त्यादृष्टीने अभ्यास सुरू केल्यानंतर चिमणी वाचविण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न सुरू केले. शहरी भागात चिमणी कशी वाचेल याचा अभ्यास करताना त्यांनी परदेशातील पक्ष्यांचा त्यांच्या राहणीमानाचादेखील अभ्यास केला. या अभ्यासात युरोपियन डिझाइनचे घरट्यांना प्रामुख्याने अभ्यास करताना हे जाणवले की, ही घरटी चिमण्यांचे अधिक कष्ट घेतात. या घरट्यांची उंची कमी केली तर चिमणीचे कष्ट कमी होऊन त्या घरट्यांसाठी लागणार्‍या साहित्यातही बचत होते. तसेच अशी घरटी पावसामुळेही लवकर खराब होतात त्यामुळे जावळे यांनी विविध प्रकारची घरटी तयार करून शहरात चिमण्या असलेल्या ठिकाणी लावली. त्यातून एका घरट्याची निवड करण्यात आली. आज चारशे ठिकाणी या घरट्यांमध्ये चिमण्या वास्तव्यास आहेत.
अशी आहे घरट्याची रचना
*चिप प्लायने बनविलेले हे घरटे पावसाळ्यातही मजबूत राहाते. किमान 10 वर्षे हे घरटे टिकते.
* घरटे कुठेही अडकवता येईल
* खाली पडले तरी घरटे तुटत नाही.
* आकर्षक, सुंदर शोपीस दिसावे असे घरटे
* साधारणत: 32 मिलिमीटर चिमणीचा आकार असतो. त्यानुसारच या घरट्यात जाण्यासाठी होल तयार करण्यात आले आहे.
* चिमणीव्यतिरिक्त कोणताही मोठा पक्षी त्यात शिरू शकत नाही. त्यामुळे चिमण्यांचे व पिलांचे रक्षण होते.
* घरट्याची खोलीही र्मयादित.
* घरट्यात हवा खेळती राहील अशी त्याची रचना. * त्याचे छप्पर हे वॉटरप्रुफ आहे.
* घरट्याचे छप्पर उतरते असल्याने कोणत्याही मोठय़ा पक्ष्याला त्यावर बसता येत नाही.
* विशेष म्हणजे या घरट्याला एक ड्रेनेज होलही देण्यात आले आहे.
* यासंदर्भात अधिक माहितीसाठी डॉ. चेतन जावळे 9422770869, मिलिंद पवार 9764005348 यांच्याशी संपर्क साधावा.
दाणा खा.. पाणी पी..
नेचर कॉन्झव्र्हेशन सोसायटी त्यापैकीच एक. या सोसायटीचे अध्यक्ष, पक्षीमित्र आणि पक्षी अभ्यासक बिश्वरूप राहा यांच्या बागेत तर चिमण्यांची शाळाच भरलेली दिसते. त्यासाठी राहा सरांनी ठिकठिकाणी बर्डफिड ठेवले आहेत. त्यामुळे चिमण्यांच्या पोटभर अन्नाची सोय याठिकाणी झाली असल्याने याठिकाणी दिवसभर चिवचिवाट ऐकू येत असतो.
चिमणी
नाशिक जिल्ह्यात चिमणी (हाउस स्पॅरो) आणि पीतकंठ किंवा रान चिमणी (यलो थ्रोटेड चिमणी) अशा दोन प्रकारच्या चिमण्या आढळतात. त्यातील हाउस स्पॅरो अर्थात तुमच्या आमच्या परिसरात दिसणारी चिमणी सध्या कमी होत आहे. ही चिमणी प्रामुख्याने शहरात वास्तव्यास असते. मात्र, शहरीभागापेक्षा आता या चिमण्यांची संख्या ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणावर आहे. शहरीकरणाचा वाढलेला वेग, प्रदूषण आणि चिमण्यांना न मिळणारे खाद्य यामुळे हा चिवचिवाट कमी झाला आहे. चिमण्यांचे मुख्य अन्न म्हणजे बिया, भात, गहू, बाजरी हे आहे. मात्र, शहरात चिमणीला हे खाद्य मिळेनासे झाले. तेच गावाकडे घरातील महिला धान्य निवडतानाही चिमणीला ते घालते. त्यामुळे चिमण्यांची मुख्य गरज पूर्ण होते. त्यामुळे ग्रामीण भागात आजही हजारोंच्या संख्येने चिमण्या दिसतात.
रान चिमणी
शहरी भागात फारशी न आढळणारी चिमणी म्हणजे पीतकंठ चिमणी. याच चिमणीला रान चिमणी म्हणतात. ही चिमणी प्रामुख्याने नाशिक शहराबाहेरील जंगल परिसरात अढळते. विख्यात पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांना एकदा एक मृत चिमणी आढळली होती. त्यांनी तिला बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीत नेऊन परीक्षण केले असता ती हाउस स्पॅरो नसल्याचा निष्कर्ष निघाला. या चिमणीच्या मानेजवळ एक पिवळा ठिपका असतो त्यामुळे या चिमणीला पीतकंठ म्हणतात तसेच ती रानात दिसून येते त्यामुळे तिला रान चिमणीही म्हणतात. ही चिमणी प्रामुख्याने हरसूल, पेठ, इगतपुरी या भागात आढळते.

रान चिमणीही आता काहीअंशी कमी होत चालली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे चिमणीची शिकार. रानावनात गलोरने चिमणीची शिकार केली जाते. रानावनातील नागरिकांमध्ये पक्ष्यांबद्दल असलेले अज्ञान, तसेच काही ठिकाणी अशा पक्ष्यांचा अन्न म्हणूनही वापर केला जातो. त्यामुळे चिमण्यांना पारध केले जात असल्याने अशा चिमण्याही कमी होत चालल्या आहेत. नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी आणि वनविभागाच्या ग्रामीण भागात यासंदर्भात जनजागृतीचे गेल्या सात ते आठ वर्षांपासून काम सुरू आहे.
नर चिमणी
या चिमणीचे डोके राखाडी रंगाचे असते. तसेच तिचा गळा व डोळ्याभोवती काळा रंग असतो. ही चिमणी अंगाने भक्कम असते.
मादी चिमणी
ही चिमणी भुरकट राखाडी रंगाची असते. साधारणत: ताठ आणि सडपातळ बांधा या चिमणीचा बघायला मिळतो. चिमणीचा विणीचा हंगाम हा वर्षभर असतो.
चिऊताईसाठी दार उघड
सकाळी-सकाळी चिमण्यांचा चिवचिवाट प्रत्येकालाच हवाहवासा असतो. मात्र, शहरात तो ऐकायला मिळत नाही. यासाठी प्रत्येकाने आपल्या बागेत, परसात जर त्यांच्या खाद्याची व्यवस्था केली तर आपल्याला चिमण्या दिसू लागतील. याचा अर्थ असा नाही की, आज आपण ‘बर्ड फिड’ ठेवले आणि उद्या लगेच 10-12 चिमण्या दिसू लागल्या. चिमणीलाही ती सवय होण्यासाठी वेळ द्यावा लागतो. मात्र, यासाठी गरज आहे ती प्रत्येकाच्या इच्छाशक्तीची. बिश्वरूप राहा, अध्यक्ष, नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी तथा मानद वन्यजीव रक्षा