आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'नृत्यसाधना'तर्फे रंगणार प्रगती उत्सव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ओडिसीनृत्याची नाशिकमध्ये आेळख करून देणाऱ्याच नव्हे; तर त्याचे धडेही देणाऱ्या नृत्यांगना डॉ. संगीता पेठकर यांच्या नृत्यसाधना कला अकादमीतर्फे त्यांचे शिष्यगण आणि मुंबईतील ज्येष्ठ नृत्यांगनांच्या बहारदार 'प्रगती उत्सव' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी (दि. १६) सायंकाळी वाजता महाकवी कालदिास कलामंदिरात हा उत्सव रंगणार आहे.

सृजनात्मक संकल्पनांची नृत्यप्रस्तुती असलेल्या प्रगती उत्सवात 'मार्गम' हा प्रकार पेठकर यांच्या शिष्या सादर करणार आहेत. तर 'समिधा' या कार्यक्रमात मुंबईतील श्रीमती दक्षा मश्रुवाला सहकारी आपली नृत्यकला रसिकांपुढे उलगडणार आहेत. या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे स्वत: संगीता पेठकर या नृत्ययोगसूत्र हा आगळावेगळा कार्यक्रम सादर करणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विक्रमजी सारडा आणि उपमहापौर गुरमित बग्गा हे उपस्थित राहणार असून, रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आरोग्यासाठी नृत्ययोग सूत्र
शारीरिकमानसिक संतुलन जाेपासण्यासाठी नृत्ययोगसूर हा वेगळा प्रकार संगीता पेठकर या कार्यक्रमाद्वारे सादर करणार आहेत. या नृत्यप्रकारात योग, आसन, प्राणायम, हस्तमुद्रा, चक्र, अॅक्युप्रेशर, म्युझिक थेरपीसारख्या अनेक बाबींचा समावेश करण्यात आला आहे. डॉ. पेठकर यांनी या प्रकारासाठी पाच वर्षे संशोधन केले आहे. या प्रकारात तब्बल २८ आसने दिसणार आहेत. तर ७८ प्रकारच्या विविध शारीरिक हालचालींमधून बनलेला हा नृत्यप्रकार संपूर्ण शरीराची रचना लक्षात घेऊन तयार करण्यात आल्याचे पेठकर यांनी सांगितले. हा प्रकार महिलांप्रमाणेच पुरुषांसाठीही खूप लाभदायक आहे. एक 'संतुलनात्मक डान्स फॉर्म' म्हणून देशामध्ये हा नृत्यप्रकार नावलौकिक मिळवत आहे.