आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचाऱ्यास मारहाण; ‘अाधार’ अाजपासून बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- आधारकार्ड केंद्र एजन्सीच्या कर्मचाऱ्यास नागरिकांकडून मारहाण झाल्याचा प्रकार मेनरोड येथील महापालिकेच्या पूर्व विभागीय कार्यालयात पंचवटी विभागीय कार्यालयात शुक्रवारी घडला. या मारहाणीचा निषेध करत एजन्सीकडून शुक्रवारी दुपारपासून येथील केंद्र बंद करण्यात आले. दरम्यान, आधार कार्ड केंद्रावरील कर्मचाऱ्याच्या सुरक्षेसाठी जोपर्यंत सुरक्षारक्षक नेमण्यात येत नाही तोपर्यंत अाधार कार्ड केंद्र बंद राहणार असल्याचा इशारा आधार एजन्सीकडून देण्यात अाला आहे. दरम्यान, शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना अाधार कार्ड बंधनकारक केल्याने हे कार्ड काढण्यासाठी गर्दी हाेत असतानाच, या केंद्रांच्या बंदमुळे नागरिकांचे हाल हाेत अाहेत.
शहरातील नागरिकांचे आधार कार्ड काढण्याचे काम कार्वी डेटा मॅनेजमेंट या खासगी एजन्सीकडे देण्यात आले अाहे. गेल्या दोन वर्षांपासून या संस्थेचे पालिकेच्या मेनरोड येथील पूर्व विभागीय कार्यालयासह शहरातील सर्वच विभागीय कार्यालयांत आधार कार्ड केंद्र आहे. या केंद्रात दररोज शेकडो नागरिक आधार कार्ड काढण्यासाठी येतात. शुक्रवारी मेनरोड येथील केंद्रावर काही तंात्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे आधार कार्ड काढण्यास वेळ लागत होता. याचाच राग आल्याने एका नागरिकाने या सेंटरवरील एका कर्मचाऱ्यास शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकारानंतर कार्यालयात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. तर, पंचवटी विभागीय कार्यालयातही अशाच प्रकारे दोन टवाळखोर युवकांकडून महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यात आल्याने या केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला हाेता. पालिकेच्या कार्यालयात अशाप्रकारे मारहाणीचा प्रकार होत असल्याने कर्मचाऱ्यांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेचा निषेध करत आधार कार्ड एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी हे केंद्र शुक्रवारी बंद ठेवले. तसेच, जोपर्यंत सेंटरवरील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक िदले जाणार नाहीत तोपर्यंत केंद्र बंद राहील, असा पवित्रा सेंटरचालकांनी घेतला अाहे. यासंदर्भातील उपआयुक्त रमेश बहिरम, पूर्व विभागीय अधिकारी मालिनी शिरसाठ यांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच, शनिवारपासून मेनरोड, पंचवटी केंद्रासह शहरातील इतरही सेंटर बंद करण्याचा इशारा एजन्सीकडून देण्यात आला आहे.

नागरिकांचे हाल
महाविद्यालयीन,शाळेतील विद्यार्थ्यांना आधार कार्ड बंधनकारक करण्यात अाले अाहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आधार कार्ड केंद्रांवर गर्दी वाढली आहेे. मात्र, या प्रकारानंतर शुक्रवारी अचानक सदर केंद्र बंद झाल्याने नागरिकांचे हाल झाले.
‘अाधार’ची एजन्सी असलेल्या कार्वीच्या कार्यालयात गर्दी.
कर्मचाऱ्यांची सुरक्षा धोक्यात..
तांत्रिकअडचण निर्माण झाल्यामुळे आधार कार्डच्या प्रक्रियेला वेळ लागत होता. याचा विचार करता थेट शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. शासकीय कार्यालयातच असे प्रकार घडत असल्याने कर्मचाऱ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. या सेंटरवरील कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षारक्षक नेमले पाहिजेत. शाहनवाजशेख , व्यवस्थापक, कार्वी डेटा मॅनेजमेंट
गेल्या डिसेंबर महिन्यात मेनरोड परिसरातील विभागीय कार्यालयात सुरू असलेल्या आधार केंद्रात एजन्सीच्या सुपरवायझरला मारहाण झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वीच अशी घटना याच केंद्रावर पुन्हा घडल्यानंतर कर्मचाऱ्यांकडून विभागीय अधिकाऱ्यांकडे सुरक्षिततेसाठी मागणी करण्यात आली होती. शुक्रवारी पुन्हा पंचवटी आणि मेनरोड येथील आधार केंद्रावर अशी घटना घडल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

हे केंद्र राहणार बंद
पंचवटीविभागीय कार्यालयातील केंद्र, मेनरोड येथील आधार केंद्र, पंडित कॉलनी येथील पश्चिम विभागीय कार्यालयातील आधार केंद्र, सिडको विभागीय कार्यालयातील अाधार केंद्र आजपासून बंद राहाणार