आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमणवाढीस अधिकारीच जबाबदार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - विभागात अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात वाढली असून, त्याला महापालिकेचे अधिकारीच जबाबदार आहेत, असा गंभीर आरोप सिडको प्रभागातील नगरसेवकांनी बुधवारी प्रभाग सभेत केला. पाणीपुरवठा विभाग निष्क्रिय झाल्याचाही आरोप करून नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. लोकप्रतिनिधींनी अतिक्रमणे हटविण्याची मागणी करूनही दुर्लक्ष केले जाते. अनेक ठिकाणी महापालिका अधिकारी कर्मचारी अतिक्रमणधारकांकडून वसुली करीत असल्याने कारवाई केली जात नसल्याचा आरोपही करण्यात आला.
सभापती कांचन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रभाग सभेत नगरसेवक लक्ष्मण जायभावे, उत्तम दोंदे, अरविंद शेळके, कल्पना पांडे, रत्नमाला राणे, शीतल भामरे, हर्षा बडगुजर, शोभा फडोळ, शोभा निकम, वंदना बिरारी, सुवर्णा मटाले आदींनी पाणी, घंटागाडी, स्वच्छता, आरोग्य, नालेसफाई, पथदीप, धूर फवारणी, अतिक्रमण, रस्ते आदी विषयांवर तक्रारी मांडल्या. दरम्यान, यावेळी लाखो रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली.

ठाकरे सभागृहाच्या गैरवापराची तक्रार
^ एकीकडेपाण्याचा अपव्यय होतो आहे, तर दुसरीकडे पाणीच मिळत नाही. नियोजन नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे. रत्नमाला राणे, नगरसेविका

^डीजीपीनगर भागातीलवाढत्या अतिक्रमणांमुळे अपघात होत आहेत. दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे अतिक्रमण वाढलेय. काम करायचे नसेल, तर खुर्ची सोडा सुवर्णा मटाले, नगरसेविका

^पाणीपुरवठा विभागनिष्क्रिय झाला असून, पंडितनगर, मोरवाडी भागात नेहमीच पाणीपुरवठा विस्कळीत होतो. अनेक वेळा गढूळ पाणी येते. चौकाचौकांत पाण्याच्या टाक्या बसावाव्यात. शीतल भामरे, नगरसेविका

^शिवाजी चौकातअतिक्रमित भाजीविक्रेते थेट नागरिकांच्या दारात व्यवसायासाठी बसतात. दादागिरी करतात. लोकप्रतिनिधींचे ऐकत नाहीत. अतिक्रमण विभाग का कारवाई करीत नाही? कल्पना पांडे, नगरसेविका

^अंबड इतरभागात दररोज लाखो लिटर पाणीपुरवठा होतो. त्याचा हिशेब द्यावा. पाण्याचा एक टँकर पाठवितात, बिले मात्र १० टँकरची लावतात. अनेक ठिकाणी जलकुभांना झाकणेही नाहीत. उत्तम दोंदे, नगरसेवक

^पाथर्डी फाटायेथे चायनीज खाद्यपदार्थांचे अतिक्रमण वाढले आहे. मागणी करूनही कारवाई केली जात नाही. अतिक्रमण विभागाचे कर्मचारी अधिकारी या ठिकाणाहून हप्ते घेतात. लक्ष्मण जायभावे, नगसेवक