आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंधन बचतीचा संदेश देत बसद्वारे कुंभमेळा विकासकामांची पाहणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मंगळवारी सकाळी ११.३० वाजेची वेळ... विभागीय अायुक्त, जिल्हाधिकारी, पाेलिस अायुक्त, महापालिका अायुक्त, एसटीच्या विभाग नियंत्रक, विभागीय अायुक्त, शहर अभियंता, मेळा अधिकारी, सहायक मेळा अधिकारी यांच्या वाहनांचा ताफा अचानक मुंबई नाक्यावरील महामार्ग बसस्थानकात येताे. हे सर्व अधिकारी एस. टी. महामंडळाच्या ‘ग्रीन बस’मध्ये बसतात अाणि शहरात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी करण्यासाठी मार्गस्थ हाेतात. या दाैऱ्यात याेग्यरीत्या पूर्ण झालेल्या कामांचे काैतुक, तर अपूर्ण कामांबाबत अावश्यक त्या सूचना करण्यात अाल्या. ‘दिव्य मराठी’च्या टीमने या पाहणी दाैऱ्याचा दिलेला हा लाइव्ह रिपाेर्ट.

या केल्या सूचना : >३१जुलैपर्यंत कामे पूर्ण करा.
>रस्ता राखीव ठेवा
>अतिक्रमणे काढा.

जिल्हाधिकाऱ्यांची संकल्पना
सिंहस्थविकासकामांच्या पाहणीदरम्यान प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वाहनांनी वाहतुकीला अडथळा निर्माण हाेऊ नये, इंधन बचत व्हावी म्हणून जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी बस प्रवासाची संकल्पना मांडली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी बसने प्रवास केला.

कामे त्वरित मार्गी लावण्याच्या सूचना
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांचा अाढावा घेण्यासाठीच्या पाहणी दाैऱ्यात सर्व विभागांचे अधिकारी सहभागी झाले. काम करताना येणाऱ्या अडचणी साेडवून मुदतीत कामे पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांचे अधिकारी प्रयत्न करत अाहेत. -डाॅ. प्रवीण गेडाम, अायुक्त, महापालिका
बातम्या आणखी आहेत...