आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक काेटी रुपयांच्या बाद नाेटा नाशिकमध्ये जप्त; पाच संशयित ताब्यात, अाराेपी नगर-नाशिकचे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- चलनातून बाद केलेल्या पाचशे व हजार रुपयांच्या ९९ लाख ९५ हजार रुपयांच्या नाेटा नाशिकमधील द्वारका परिसरात साेमवारी एका वाहनातून जप्त करण्यात अाल्या. पाेलिसांनी या वाहनातील पाच जणांना ताब्यात घेतले असून हे सर्व अाराेपी नगर व नाशिक जिल्ह्यातील अाहेत. या नाेटा व्यवहारात बंद झालेल्या असतानाही एवढ्या माेठ्या रकमेचे अाराेपी नेमके काय करणार हाेते, या विचाराने पाेलिस यंत्रणाही चक्रावून गेली अाहे. सुभाष कुलथे, शिवाजी दिगंबर मेट, याेगेश रवींद्र नागरे, मिलिंद नारायण कुलथे व कृष्णा हाेळकर अशी अाराेपींची नावे अाहेत.  

दरम्यान, पाेलिसांनी या नाेटा अायकर विभागाकडे जमा करण्याचा प्रयत्न केला मात्र या विभागाने त्या घेण्यास नकार दिला. त्यामुळे अाता पाेलिसांनी गृहमंत्रालयाचे मार्गदर्शन मागवले अाहे.

राष्ट्रवादीचा पदाधिकारी छबू नागरे याच्याकडे बनावट नाेटा अाढळून अाल्यानंतर नाशिक चर्चेत अाले हाेते. त्यापाठाेपाठ अाता साेमवारी शहरात एक काेटी रुपयांच्या चलनातून बाद करण्यात अालेल्या नाेटा पाेलिसांनी जप्त केल्यामुळे अशा प्रकारचे रॅकेटच सक्रिय असल्याचा संशय बळावला अाहे. साेमवारी खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या अाधारे पाेलिसांनी द्वारका परिसरात सापळा रचला हाेता. याच वेळी एका झायलाे गाडीत चार जण संशयित हालचाल करत असल्याचे पाेलिसांच्या निदर्शनास अाले. याच वेळी दुचाकीवरून कृष्णा हनूमंत हाेळकर (वय ५०) हा या गाडीजवळ अाला. त्यांना गाडीतील चाैघांनी जुन्या नाेटा असलेली थैली दाखवली. मात्र, अाजूबाजूला पाेलिस असल्याचा सुगावा लागल्याने त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सापळा रचून बसलेल्या पाेलिसांनी पाठलाग करून गाडी थांबवली व चाैघांना जणांना ताब्यात घेतले. तसेच नंतर हाेळकरलाही ताब्यात घेण्यात अाले. 

गाडीची झडती घेतली असता त्यात पाचशे व एक हजार रुपयांच्या  नाेटा अाढळून अाल्या. संशयितांकडे चाैकशी केली असता संगमनेर येथील सराफा व्यावसायिकाला चलनातून बाद झालेल्या नाेटा देऊन त्या माेबदल्यात काही कमी प्रमाणात चलनातील नाेटा घेण्याचा डाव अाराेपींनी रचला हाेता. हा व्यवहार हाेळकर यांच्या मदतीने करण्यात येणार हाेता.   
बातम्या आणखी आहेत...