आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या नाशिकचा पाणीप्रश्न अाता कायमचा सुटणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अनेक वर्षांपासून जुन्या नाशिकमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत हाेता. अाता हा प्रश्न कायमचा निकाली निघणार अाहे. महापालिका अाता जुन्या नाशकासाठी स्वतंत्र जलकुंभ उभारत असून कामालाही वेग अाला अाहे. या जलकुंभासाठी पंचवटीतून पाणी मिळणार अाहे. त्यामुळे जीपीअाे अाणि पंचवटी अशा दाेन जलकुंभांचे पाणी मिळणार असल्याने या भागातील नागरिकांची वणवण थांबणार अाहे.
जुने नाशिक भागातील नानावली, कथडा, कुंभारवाडा, पाटील गल्ली, अमरधामरोड, नाईकवाडीपुरा, शिवाजी चौक, बागवानपुरा यांसह काही भागात गेल्या काही वर्षांपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी महापालिकेत येत हाेत्या. हा परिसर उंचावर असल्यामुळे पाणी पाेहाेचण्यासाठी अडचणी निर्माण हाेत हाेत्या. यामुळे या भागासाठी स्वतंत्र जलकुंभाची मागणी स्थानिक नगरसेवक रंजना पवार, नय्या खैरे यांनी महासभेत केली होती.
यानंतर या भागात जलकुंभ उभारण्यासाठी महासभेत ठरावाला मंजुरी देण्यात आली. पालिकेकडून या जलकुंभासाठी कोटी रुपयांची मंजुरी मिळाल्यानंतर नानावली भागातील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीजवळ जलकुंभ उभारण्याला सुरुवात झाली अाहे. चार महिन्यांत हे काम पूर्ण होणार अाहे. त्यामुळे अाता या भागातील नागरिकांची पाण्यासाठी वणवण, भटकंती थांबणार असल्याने नागरिकांनीही समाधान व्यक्त केले अाहे.

खर्च असा...
भटकंती थांबणार

^स्वतंत्रजलकुंभासाठीप्रस्ताव सादर केला होता. पाठपुरावा करून मंजुरी मिळवली आणि आता कामाला सुरुवातही झाली. यामुळे जुन्या नाशिकचा पाण्याचा प्रश्न कायमचाच सुटणार आहे. रंजनापवार, नगरसेविका

जुने नाशिक भागातील नानावली, कथडा, कुंभारवाडा, पाटील गल्ली, अमरधामराेड, नाईकवाडीपुरा,शिवाजी चौक, बागवानपुरा, चौक मंडई, काझीपुरा, बुधवार पेठ, दूधबाजार, खडकाळी, मेनरोड, धुमाळ पाॅइंट.

बातम्या आणखी आहेत...