आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील सिद्धार्थ दराडेकडे दुर्मिळ दुचाकींचा संग्रह‘

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - पूर्ण उडालेला रंग, प्रचंड आवाज आणि गंजलेले पार्ट्स, सीट थोडे खिळखिळे झालेले अशी दुचाकी चालवायची म्हणजे मोठी कसरत. पण, अशी दुचाकी केवळ गल्लीतच नाही तर पुणे ते बेळगाव, धारवाड, पुणे ते नाशिक चालविण्याची करामत पुणे येथील सिद्धार्थ दराडे हा तरुण गेल्या काही वर्षांपासून करीत आहे. रॉयल इनफिल्डची ही 1932 मधील दुचाकी चालवत त्याने प्रजासत्ताकदिनी येथील सोमेश्वर लॉन्सपासून आयोजित केलेल्या हेरिटेज व्हेइकल्स रॅलीमध्ये मोठय़ा दिमाखात सहभाग घेतला.

पुण्यात शंकरशेठ रोड येथे राहणार्‍या 34 वर्षीय सिद्धार्थची ही दुचाकी म्हणजे एक अजब वाहन आहे. या दुचाकीची मूळ ओळख जपण्याकरिता त्याने या दुचाकीला रंग दिलेला नाही. ही दुचाकी सध्या एक लिटर पेट्रोलवर 30 किलोमीटर चालते व या गाडीचा सरासरी वेग आहे ताशी 100 किलोमीटर. विशेष म्हणजे, या गाडीचे सुटे भागदेखील त्याच्याकडे उपलब्ध आहेत. या दुचाकीवरून त्याने मुंबई, बेळगाव, धारवाड असा प्रवास केला असून, पुणे ते नाशिक आणि या रॅलीमध्येही त्याने या गाडीमुळे लक्ष वेधून घेतले. या प्रवासात एकदाही ही गाडी बंद पडली नाही, असे सिद्धार्थ सांगतो.

वडिलांचाही संग्रह

सिद्धार्थने जुन्या गाड्या जपण्याची आवड आपल्या वडिलांकडून घेतली आहे. आजमितीला त्यांच्याकडे ट्रॅम, मॅचलस, बीएसए, बीएसए रोडरॉकेट, 650, नॉर्टन, मोटो गुझी हँडगिअर, एजीएस 500 टिवन अशा 1930, 1942, 1954 अशा काळातल्या वीस दुचाकी गाड्यांचा दुर्मिळ संग्रह आहे.