आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळ चांगल्या गुणांनी ‘बारावी पास’, सहा वर्षांच्या विलंबानंतर दिली परिक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक -  नाशिक जिल्ह्यातील व चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथील ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळ चांगल्या गुणांनी ‘बारावी पास’ झाला आहे. रोईंगपटू असणाऱ्या दत्तु बबन भोकनळ यास बिजींग येथील 16 व्या एशियन चॅम्पीयनशिप 2015 चे रौप्यपदक प्राप्त केले. 

रोईंग म्हणजेच नौकानयन क्रीडा प्रकारात ऑलिम्पिकमध्ये भारताचं नेतृत्व करणाऱ्या दत्तू भोकनळने यंदा बारावीची परीक्षा दिली होती. दत्तूला लासलगावच्या दत्ताजी पाटील हायस्कूलमध्ये परीक्षा केंद्रात त्याने  परीक्षा दिली. सहा वर्षांपूर्वी दहावीनंतर दत्तू लष्करात दाखल झाला आणि त्याने रोईंग खेळात प्राविण्य मिळवले.
बातम्या आणखी आहेत...