आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Once Again Combing Operation For Crime Control In Nashik

गुन्हे नियंत्रणासाठी नाशकात पुन्हा कोम्बिंग ऑपरेशन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - गुन्हे नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी पुन्हा कोम्बिंग ऑपरेशन राबवले. 18 प्रमुख चौकांत नाकेबंदी करण्यात आली. पाचशेहून अधिक वाहनांची तपासणी करून 90 चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. ‘ट्रिपल सीट’बद्दल दहा चालकांवर कारवाई झाली. 50 हून अधिक गुन्हेगारांचा शोध घेण्यात आला.


पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, उपआयुक्त साहेबराव पाटील, संदीप दिवाण, डॉ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली मल्हारखाण, घारपुरे घाट, फुलेनगर, वज्रेश्वरी झोपडपट्टी, गंगापूररोड परिसर, संत कबीरनगर, सातपूर, सिडकोतील लेखानगर, पेठेनगर परिसरात ऑपरेशन राबवण्यात आले.


हाताला प्लास्टर... : उपआयुक्त पाटील हाताला प्लास्टर असताना वाहने थांबवत कर्मचा-यांना सूचना देत होते. काही वाहनचालक व महिलांनी यावेळी नाकेबंदी योग्य असली तरी ‘50-100 रुपयांची मागणी’ अयोग्य असल्याची व केवळ दुचाकीलाच लक्ष्य न करता कार, ट्रक, टेम्पो तपासणीची गरज व्यक्त केली.


या भागात नाकेबंदी
महात्मानगर, जेहान सर्कल, चांडक सर्कल, चोपडा लॉन्स, द्वारका, पेठरोड, तपोवन, लक्ष्मीनारायण मंदिर, पिंपळगाव बहुला, उंटवाडी पूल, राणेनगर सिग्नल, अशोका मार्ग, उपनगरमधील नारायणबापूनगर, वडाळा परिसर