आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात प्रीपेड रिक्षासेवेला पुन्हा खो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- प्रीपेड रिक्षासेवेचा दसर्‍याचा मुहूर्तदेखील हुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांना आणखी आठवडाभर या सेवेसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. नाशिकरोड रेल्वेस्थानकावरून शहरातील विविध मार्गांसाठी ही सेवा उपलब्ध होणार आहे.

जिल्हा प्रशासन, पोलिस व परिवहन विभाग या यंत्रणांच्या सहकार्याने प्रीपेड रिक्षासेवा सुरू करण्याचे नियोजन काही महिन्यांपूर्वी करण्यात आले. मात्र तांत्रिक कारणांमुळे 15 ऑगस्टचा मुहूर्त टळला. रात्रीचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने या मार्गांवर प्रीपेड रिक्षासेवेचा प्रस्ताव मंजूर केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी संस्थेचे डॉ. गिरीश मोहिते यांनी प्रीपेडसाठी सादर केलेल्या प्रस्तावानुसार प्रादेशिक परिवहन विभागाने दर ठरवून दिलेले असून, त्यावर प्रत्येक रिक्षामागे दोन रुपये जादा शुल्क आकारण्यात येणार आहे. प्रीपेड सेवेसाठी रेल्वे प्रशासनाने जागा आणि केबिन उपलब्ध करून दिले असून, 70 मार्गांवर भाडे ठरवून मंजुरी दिली आहे.