Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | once again ravindra mirlekar appointed as shiv sena leader in nashik

शिवसेना संपर्कप्रमुखपदी पुन्हा रवींद्र मिर्लेकर

प्रतिनिधी | Update - Apr 21, 2013, 04:04 AM IST

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना हटवून परभणी, जालन्याची जबाबदारी देण्यात आली होती.

  • once again ravindra mirlekar appointed as shiv sena leader in nashik

    नाशिकरोड- नाशिक जिल्ह्यातील संघटनेची घडी बसवून पुनर्वैभव प्राप्त करण्यासाठी मागील काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या शिवसेनेच्या संपर्कप्रमुखपदी उपनेते रवींद्र मिर्लेकर यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी नियुक्ती केली. नाशिकसह परभणी व जालना जिल्ह्याच्या संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. शिस्त व स्वत: कार्यकर्त्यांसमवेत संघटना बांधणीसाठी कठोर परिश्रम घेणारे नेते म्हणून ओळख असलेल्या मिर्लेकर यांना नाशिक जिल्हा नवीन नसून, त्यांनी यापूर्वी सन 2009च्या पंचवार्षिकमध्ये नाशिकच्या संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी सांभाळली होती.

    लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना हटवून परभणी, जालन्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांच्या बदलीनंतर अरविंद सावंत यांच्याकडे जबाबदारी सोपवली.

    लोकसभा निवडणुकीच्या कार्यकाळात विश्वनाथ नेरूळकर यांची नियुक्ती केली गेली. पुन्हा सावंत यांना संधी मिळाली. संघटनेचा गाडा पूर्वपदावर येत असल्याचे लक्षात आल्यावर कटकारस्थानाने मिर्लेकर यांना हटवण्यासाठी स्थानिक पातळीवरून प्रयत्न केले गेले. त्यात यशदेखील आले. त्यांना हटवून सावंत यांना पुन्हा नाशिकला पाठवण्यात आले.

    दरम्यानच्या काळात शहर संघटनेतील वाढती गटबाजी, स्थायी समितीवर नियुक्तीवरून सावंत यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपांमुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना नाशिकला जाण्यास बंदी घालून कामकाज थांबवण्याचे आदेश दिले होते. तेव्हापासून जवळपास वर्षापासून नाशिकचे संपर्कप्रमुखपद रिक्त होते. त्या पदाची शनिवारी घोषणा करण्यात आली.

Trending