आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • One Acre Land To Nashik Advocate Bar Mumbai High Court

नाशिक वकील संघास एकर जागा, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जिल्हा न्यायालयाच्या लगत असलेल्या पोलिस मुख्यालयातील पाच एकर जागा नाशिक वकील संघाला देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. नाशिक बार असोसिएशनने गृह विभागाकडे जागा मिळण्यासाठी मागणी केली होती. गुरुवारी (दि. ३) उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक न्यायमूर्ती सी. व्ही. भडंग यांनी जाग देण्यासाठी आदेश दिले असून, लवकरच जागा हस्तांतरासाठीची पूर्तता केली जाणार आहे.

नाशिक न्यायालय ब्रिटिशकाळापासून पाच एकर जागेत कार्यरत आहे. वर्तमानकाळात वकिलांची संख्या वाढल्याने ही जागा कमी पडत असल्याने नाशिक वकील संघाच्या वतीने २० वर्षांपासून लगतच्या पोलिस मुख्यालयातील काही जागा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. संघाच्या वतीने शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. अलीकडेच ज्येष्ठ वकील का. का. घुगे यांनी जागेच्या प्रश्नासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. नाशिक वकील संघाने याचिकेत सहभागी होऊन जागेसाठी जोरदार मागणी केली होती.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार न्यायालय दुसरीकडे स्थलांतर करण्याची शक्यता पडताळली जात होती. मात्र, बार असोसिएशनकडून पक्षकार वकिलांच्या दृष्टीने सध्याची जागा सोयीची असल्याने या जागेसाठी मागणी कायम ठेवली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी गुरुवारी आदेश पारित करून शासनाने सध्या पोलिस मुख्यालयातील पाच एकर जागा न्यायालयासाठी द्यावी त्याची पूर्तता करणेकामी पुढील तारीख दिली आहे. हा आदेश न्यायालयात कळताच वकिलांनी पेढे वाटप करून आनंद साजरा केला. अनेक दिवसांपासून असलेली जागेची मागणी पूर्ण झाल्याने वकील संघाने आनंद व्यक्त केला. बार संघाचे अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे, जागेसाठी प्रयत्न करणारे न्यायाधीश, ज्येष्ठ वकील यांचे अाभार मानले. अॅड. सुरेश निफाडे, अॅड. जालिंदर ताडगे, अॅड. हेमंत गायकवाड, अॅड. संजय गिते, अॅड. माणिक बोडके, अॅड. अपर्णा पाटील, अॅड. मंगला शेजवळ, अॅड. दीपक पाटोदकर, अॅड. बाळासाहेब आडके यांच्यासह बार संघाचे पदाधिकारी वकिलांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

अनेक दिवसांची मागणी पूर्ण
न्यायालयासाठी जागेची अनेक दिवसांची मागणी पूर्ण झाली. जागा मिळ‌वण्यासाठी वकील संघाचे पदाधिकारी आणि ज्येष्ठ वकिलांच्या सहकार्याने जागा मिळणे शक्य झाले. भविष्यात जागेसंबंधी अडचण निर्माण होणार नाही. - अॅड. नितीन ठाकरे, अध्यक्ष,नाशिक बार असोसिएशन