आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेला मिळाला दीडशे काेटींचा ‘अाधार’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेला शासनाकडून १५० काेटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात अाला असून, हा निधी मिळाल्याने खाेळंबलेली कामे मार्गी लागण्याची अाशा निर्माण झाली अाहे.सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी १०५२ काेटी रुपयांचा अाराखडा असून, त्यात महापालिकेला शासनाकडून दाेन तृतीयांश निधी येणार हाेता. त्यानुषंगाने ६३९ काेटी रुपये अपेक्षित अाहेत. प्रत्यक्षात सिंहस्थ पर्वणी ताेंडावर अाली असताना ३६७ काेटीच मिळाले हाेते.

महापालिकेत अार्थिक खडखडाट असल्यामुळे विकासकामांची देयके कशी काढायची असा प्रश्न हाेता. त्यात काही कामांना ब्रेकही लागला हाेता. या पार्श्वभूमीवर महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवून दाेनशे काेटींची मागणी केली हाेती.
बातम्या आणखी आहेत...