आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपटात काम देण्याच्या अामिषाने 30 लाखांना गंडा, नाशिकचा तोतया चित्रपट दिग्दर्शक जेरबंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- दामदुप्पटच्या नावाखाली विविध कंपन्यांनी शहरवासीयांना गंडा घालण्याचे प्रकार घडत असतांना आता मराठी चित्रपट मालिकेत काम देण्याचे अामिष देत नवाेदित कलाकारांना सुमारे ३० लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार मंगळवारी (दि. २०) सायंकाळी उघडकीस आला. याप्रकरणी तोतया चित्रपट निर्माता आणि मॉडेलिंग इन्स्टिट्यूटच्या संचालकाच्या विरोधात मुंबईनाका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी शरद पाटील यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार संशयित हॅरी सपकाळे याने मुलीला ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटात काम देण्याचे अामिष दाखविले. चित्रपट साइन केल्याचे करारपत्र दिले या बदल्यात फॉर्म फी लाख रुपये आणि पॅरीस येथे चित्रिकरणास जाण्यासाठी लाख ६५ हजार रुपयांचे एअर तिकट घेण्यासाठी रोकड घेतली. तसेच चित्रपटात काम मिळाल्याच्या करारापोटी सुमारे १० लाख रुपयांचे मानधनाचे बोगस धनादेश दिले. विश्वास वाढल्याने पाटील यांच्याकडून कमीशन म्हणून चार लाख रुपये रोख स्वरुपात घेतले. दोन महिन्यात चित्रिकरण सुरू होणार असल्याचे सांगत भेटण्यास टाळाटाळ करत असल्याने पाटील यांना संशय आला. सहायक पाेलिस आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांच्याशी त्यांनी संपर्क साधला. डॉ. भुजबळ यांनी संशयिताची सर्व माहिती गोळा केली असता. 

‘हॅरी सॅप मॉडेलींग ही कंपनीच बोगस असल्याची धक्कादायकक माहिती मिळाली. अधिक तपासात पाथर्डी फाटा येथे संशयित पाच रुम किचनच्या अलिशान फ्लॅटमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. संशयितावर पाळत ठेवण्यात आली. मंगळवारी सायंकाळी नवीन सिबिएस येथे पथकाने सापळा रचून हॅरीला अटक केली. उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.भुजबळ आणि मुंबईनाका पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. संशयित हॅरी याने मॉडेलिंग या कंपनीच्या अाधारे सधन कुटुंबातील अनेक मुलींना चित्रपट मालिकेत काम देण्याचे प्रलोभन देत त्यांच्याकडून बख्खळ रक्कम घेत. त्यांचा लैंगिक छळ केल्याचा संशय आहे. पाच रुमच्या अलिशान फ्लॅटमध्ये तो एका मुलीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. 

मालेगावमध्येही घातला गंडा 
हॅरीचे नाशिकसह मालेगाव येथील नवाेदित कलाकारांना गंडा घातल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. मालेगाव येथील काही कलाकारांनी पाेलिसांशी संपर्क साधत फसवणूक झाल्याची माहिती दिली. फसवणुकीचे आणखी प्रकार उघडकीस येतील. 
- डॉ. राजू भुजबळ, सहायक आयुक्त विभाग 
बातम्या आणखी आहेत...