आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योजकाचे अपहरण करून लुटले, एक संशयित अटकेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - आर्थिक व्यवहारातून एका उद्योजकाला जिवे मारण्याची सुपारी घेणार्‍या टोळीने या उद्योजकालाच ‘तुम्हाला मारण्याची सुपारी घेतली असून, तुम्हाला जिवंत राहायचे असल्यास 15 लाख द्यावे लागतील,’ असे सांगत पिस्तूलचा धाक दाखवित अपहरण केल्याची घटना घडली. या व्यावसायिकाने आपली सुटका करून घेतली असली तरी त्यांची सुमारे एक लाखाची रोकड टोळीने लुटून नेली. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी एका संशयितास अटक केली आहे.

उद्योजक राजेश मफतलाल संगवानी (रा. अर्चिड बिल्डिंग, नाशिकरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, बुधवारी सायंकाळी 7 वाजता संशयित संदीप सुभाष हगवणे (रा. सातपूर) आणि एक बढे नामक व्यक्ती यांनी पैसे देण्याच्या बहाण्याने एबीबी सर्कल येथे बोलावले व त्यांच्याच कारमध्ये बसून त्यांचे अपहरण करून त्यांची लूट केली. या प्रकरणी संशयित राजेश मफतलाल धोबिया (रा. गुलमोहोर कॉलनी, सातपूर) यास अटक केली असून, दोघांच्या तपासासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत.