आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावमधील नरभक्षक बिबट्या नाशकात, हल्‍ल्‍यात 7 वर्षीय बालक ठार, आतापर्यंत 7 बळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगाव- जळगाव जिल्ह्यातील वरखेडे येथे धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याने बुधवारी रात्री मालेगाव तालुक्यातील साकूर येथे कुणाल प्रकाश अहिरे (वय ७) या बालकावर हल्ला करत त्याचा बळी घेतला. आत्तापर्यंत या बिबट्याच्या हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. 

 

घटनेनंतर संतप्त ग्रामस्थ हातात काेयते घेऊन उसाच्या शेतांमध्ये शिरत बिबट्याचा शाेध घेत हाेते. वनविभागाच्या कुठल्याही सूचनेला न जुमानता बिबट्याला अाता अाम्ही ठार मारू असा निर्धार ग्रामस्थांनी केला हाेता.

 

बालकास घेऊन बिबट्या शेतात पसार, सातवा बळी

वरखेडेतील बिबट्याने बुधवारी सातवा बळी घेतला. लघुशंकेला झाेपडीतून बाहेर उभ्या असलेल्या ७ वर्षीय बालकास बिबट्याने ठार केले. ही घटना मालेगाव तालुक्यातील साकूर शिवारात घडली. तत्पूर्वी, उपखेडेजवळ महिलेवर हल्ला करून बिबट्याने जखमी केले हाेते. शेतातील झाेपडीत राहणाऱ्या कुटुंबातील कुणाल प्रकाश अहिरे (७) हा लघुशंकेसाठी झाेपडीतून रात्री 9.30 वाजता बाहेर उभा राहीला. दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. अारडाअाेरड करताच बिबट्या त्याला घेऊन उसाच्या शेतात पसार झाला.

 

दुपारी तीननंतरच हल्ले 
बिबट्याकडून दुपारी तीन ते सायंकाळी पाच याच वेळात हल्ले हाेत असल्याचे अाठ ते दहा घटनांवरून दिसून येते. बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या सहा पैकी चार घटना या दुुपारी तीन ते सहा याचवेळात घडल्या असून इतर हल्लेही दुपारी याच वेळेत झाले अाहेत. या घटनांवरून वरून बिबट्या नेमका याच वेळात शिकारीसाठी बाहेर पडत असल्याचे स्पष्ट हाेते.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा,

- शाेध माेेहीम सुरू वरखेडेत; बिबट्याचा हल्ला उपखेडेत

- 5 महिन्‍यांत 7 बळी

 

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...