आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकाच कुटुंबातील तिघे बसखाली चिरडून ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिंडोरी - दिंडोरीयेथील बसस्थानकालगत बसच्या मागच्या चाकाखाली मोटारसायकल आल्याने झालेल्या अपघातात तालुक्यातील एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. देवीदास अर्जुन गवे (वय ३०) या मोटारसायकलचालक पित्यासह त्यांची दीड वर्षीय कन्या रक्षा अडीच वर्षीय मुलगा निशांक यांचा मृतांमध्ये समावेश आहे. तर, पत्नी संगीता गंभीर जखमी असून, त्यांना उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सप्तशृंगगडावरून नाशिककडे जाणारी बस (एमएच १२, इएफ ६९१६) दिंडोरी उर्वरित.पान १२
एकाच कुटुंबातील तिघांचा बसखाली चिरडल्याने मृत्यू बसस्थानकातप्रवेश करत असतानाच मोटारसायकल (एमएच १५, इटी ९४३१) तिच्या मागील चाकाखाली सापडली. त्यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. गवे कुटुंबीय हे कळवण तालुक्यातील साकोरे येथे मामांना भेटण्यासाठी गेले होते. भेट झाल्यानंतर नाळेगावला परतत असताना हा अपघात झाला. दिरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी बसचालक व्ही. बी. सोनवणे यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, निरीक्षक संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आव्हाड, देवकाते, काकड या प्रकरणी तपास करीत आहेत.

नाळेगावावर शोककळा
नाळेगाव येथे देवीदास गवे हे कुटुंबीयांसह राहात होते. बालपणीच त्यांचे आई-वडील निवर्तले. त्यानंतर मामांनीच त्यांचा सांभाळ केला. शेती करून ते उदरनिर्वाह करीत होते. दोन लहान मुलांसह त्यांना अपघातात प्राण गमवावे लागल्याची ही घटना समजताच नाळेगाववर शाेककळा पसरली.
असा झाला अपघात
गडावरूनआलेली बस सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दिंडोरी स्थानकात येताच बाजूने धक्का लागल्याने मोटारसायकलवरील गवे कुटुंबीय मागील चाकाखाली सापडले. काही क्षणातच ही बाब लक्षात येईपर्यंत चाक त्यांच्यावरून गेले. क्रेनच्या साहाय्याने बस वर उचलून मृतदेह काढण्यात आले.