आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोरेवाडीत तणाव, एक जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - गोरवाडीत किरकोळ कारणावरून दोन गटांतील वादाचे पर्यवसान दगडफेक व हाणामारीत झाले. यात एक जण जखमी झाला. दोन्ही गटांनी परस्परांविरुद्ध तक्रार दिली. गुरुवारी सकाळी गोरवाडी रेल्वे-गेटनजीक हा प्रकार घडला.

अचानक दगडफेक सुरू झाल्याने दंगलीची अफवा पसरून येथील बाजारपेठ बंद होऊन तणावपूर्ण शांतता झाली. नगरसेवक हरीश भडांगे व सुनील कांबळे यांच्या गटातील कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ कारणावरून गुरुवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. विनोद त्रिभुवन, मितेश जेडगुले, प्रशांत ऊर्फ कुणाल पगारे, प्रशांत पगारे व विजय पगारे यांना ताब्यात घेतले.

याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांत जमावबंदी व दगडफेकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक निरीक्षक बाळासाहेब थोरात तपास करीत आहेत. घटनेनंतर उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी, वरिष्ठ निरीक्षक मौला सय्यद, मच्छिंद्र केकाण, विनोद पाटील, पूनम केदारे यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. परिसरात बंदोबस्त ठेवला आहे.

हाणामारीनंतर तणाव
जुन्या नाशकातील मोठा राजवाडा परिसरात गुरुवारी मुलांच्या भांडणावरून दोन गटांत किरकोळ हाणामारी झाली. वारंवार याच ठिकाणी दोन गटांत हाणामारीच्या घटना होत असल्याने पोलिसांचा वचक कमी झाल्याचे जाणवते. या ठिकाणी नवीन पोलिस चौकीची मागणी स्थानिकांनी केली आहे. चौकी बांधण्यास टाळटाळ होत असताना हाणामारीच्या घटना वाढल्या आहेत.संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणार्‍या शिवाजी चौकात पोलिस चौकीची मागणी होत होती. पोलिस उपायुक्त साहेबराव पाटील यांनी येथील जागेची पाहणी करून चौकी बांधण्याचे दिलेले आदेश हवेतच विरले आहेत.