आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमा रक्कम हडपण्यासाठी 16 लाख लुटीचा मालकाकडूनच बनाव; पेट्रोलपंपचालकाचा पर्दाफाश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पेट्रोल कंपनीकडून मिळणारी विमा रक्कम हडपण्यासाठी पेट्रोलपंप मालकानेच रोकड लूट झाल्याचा बनाव रचल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघडकीस आले. पेट्रोलपंपाची रक्कम बँकेत भरणा करण्यासाठी जात असताना चारचाकी वाहन अडवत पिस्तूलचा धाक दाखवत गाडीत ठेवलेली १६ लाख २० हजारांची रक्कम लुटण्यात आल्याचा बनाव करण्यात आला होता. मंगळवारी (दि. ३) दुपारी वाजेच्या सुमारास औरंगाबादरोडवर लाखलगाव शिवारात ही चोरी झाल्याची तक्रार मालकानेच आडगाव पोलिस ठाण्यात दिली होती. 

मिलिंद थोरात (रा. जयभवानी रोड) यांनी तक्रारीनुसार दुपारी दोन वाजता औरंगाबादरोडवरील भारत पेट्रोलपंप येथून १६ लाख ५० हजारांची रोकड नाशिकरोड येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत भरणा करण्यासाठी स्कोडा कार (एमएच १५ एफए ७७७०) मधून जात असताना लाखलगाव शिवारात बँकेचे पास बुक विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. पंपावरील कामगारास फोन करून पासबुक घेऊन येण्यास सांगितले. कार रस्त्याच्या कडेला थांबवत असताना पाठीमागून काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीहून आलेल्या दोन हेल्मेटधारी तरुणांनी डोक्याला पिस्तूल लावत जिवे मारण्याची धमकी देत कारमध्ये ठेवलेली १६ लाख २० हजारांची रोकड बळजबरीने चोरी करून निफाडच्या दिशेने फरार झाल्याची माहिती थोरात यांनी आडगाव पोलिसांना दिली. घटना गांभीर्याने घेत उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी घटनास्थळाजवळ पोलिस अधिकाऱ्यांनी पाहणी केली. चौकशीत थोरात यांच्या चेहऱ्यावरील संशयास्पद हावभाव त्यांनी टिपले. प्रश्नांचा भडिमार केल्यानंतर थोरात यांनीच पेट्रोलियम कंपनीकडून मिळणारी विमा रक्कम मिळवण्यासाठी लुटीचा बनाव केल्याचे सांगितले. थोरात यांच्याविरोधात खोटी माहिती दिल्याचा गुन्हा दाखल झाला. 

रक्कम केली परत
लुटीचा बनाव केलेली रोकड पंपमालक थोरात यांना पोलिस अधिकाऱ्यांनी पंचनामा करत परत केली. दोन तासांत पोलिसांनी हा लुटीचा बनाव उघडकीस आणला. 
बातम्या आणखी आहेत...