आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: एक लाख हज यात्रेकरू मक्केत फडकवणार तिरंगा, सर्व भारतीय येणार एकत्रित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- एकीकडे देशात वंदे मातरम् सक्तीचे करण्याच्या मुद्द्यावरुन सुरु असलेले वाद आणि काश्मिरात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या सैनिकांवरील हल्ल्यांच्या घटनांमुळे वातावरण धुमसत अाहे. मात्र, दुसरीकडे यंदा देशातील एक लाख हज यात्रेकरुंनी १५ अाॅगस्टला मक्केतच स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची तयारी सुरु केली असून त्यांच्यात अमाप उत्साह आहे. मक्केमध्ये यंदा प्रथमच स्वातंत्र्यदिनी भारतीय हज यात्रेकरुंच्या तंबूबाहेर तिरंगा फडकणार असून तिथे प्रथमच भारतीय तिरंग्याला मानवंदना देण्याचा साेहळा हाेणार अाहे.
 
हजसाठी देशभरातून दीड लाख यात्रेकरु जाणार असून त्यापैकी १ लाख भाविक हे अातापर्यंत मक्केत पोहचलेदेखील आहेत. हजसाठी सर्वाधिक भाविक भारतातील असतात. आतापर्यंत महाराष्ट्रातून आैरंगाबाद, नागपूर व मुंबईतून यात्रेकरु हजसाठी रवाना झाले असून उर्वरीत ५० हजार यात्रेकरु रविवारी (दि.१३) पासून रवाना होण्यास सुरुवात झाली आहे.   हज यात्रेकरुंसाठी मीना येथे १० किलोमीटरच्या परिसरात तंबूनिवास असतात. एका टेंटमध्ये ५० यात्रेकरु राहतात. भारतीय हज यात्रेकरुंच्या सर्व टेंटवर भारताचा तिरंगा ध्वज फडकणार असल्याची माहिती हारुण आशिक अली यांनी दिली.

सर्व भारतीय येणार एकत्रित
दरवर्षी भारतात स्वातंत्र दिन साजरा करतो. यंदा हज यात्रा ऑगस्टमध्ये आल्याने मक्केत स्वातंत्र दिन साजरा करणार आहे. १४ ऑगस्टला सर्व भारतीयांशी संपर्क साधून एकमेकांची भेट घेणार आहोत. १५ ऑगस्टला सकाळी तिरंगा फडकवून स्वातंत्र दिन साजरा करु.
- हारुण आशिक अली, हज यात्रेकरु, मक्का

मक्केतही स्वातंत्र्यदिन
हज कमिटीसह खासगी टुर्सद्वारे भारतातून हजला गेलेले यात्रेकरु यंदा मक्केतील लॉज, हॉटेल्स आणि त्यांच्या तंबूनिवासाबाहेर तिरंगा फडकावून स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहेत.
- हाजी जहीर शेख, खादीमुल हुज्जाज, हज कमिटी
बातम्या आणखी आहेत...