आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकरोड मध्‍ये दगडाने ठेचून एकाचा खून

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - बांधकाम व्यावसायिकाच्या कर्मचार्‍याचा दगडाने ठेचून खून केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. जेलरोड पोलिस चौकीसमोरच त्याचा मृतदेह सापडला.


सुनील हरिभाऊ कोल्हे (वय 46, रा. जिजामातानगर, सुमन सोसायटी) असे मृताचे नाव असून, त्यांच्या तीन मित्रांना ताब्यात घेतल्याची माहिती उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाबासाहेब बुधवंत यांनी दिली. नितीन चौधरी (6, रा. रमाई बंगला, कदम मळा, जयभवानी रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे मेहुणे सुनील कोल्हे कन्स्ट्रक्शन कंपनीत नोकरीस होते. रविवारी रात्री 8 ला मित्रांबरोबर जेवण करण्यासाठी जात असल्याचे सांगून ते घराबाहेर पडले. सोमवारी जेलरोडच्या टाकीजवळ मृतदेह सापडला. डोक्यावर मारल्याच्या खुणा होत्या. कोल्हे यांचा मोबाइल पोलिसांच्या हाती लागला आहे.