आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरास महिनाभर पुरेल इतकेच अाता पाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहराला पाणीपुरठा करणाऱ्या गंगापूर धरणातून मराठवाड्याला साेडलेले पाणी पावसाने फिरवलेली पाठ या दाेघांचा परिणाम म्हणजे अाता नाशिक महापालिकेसाठी गंगापूर धरणात राखीव असलेला पाणीसाठा जेमतेम महिनाभर पुरेल इतकाच राहिला असून, अाता पावसाची कृपा झाल्यास दारणा धरणातील शिल्लक पाणी अारक्षण गंगापूरमधून द्यावे लागेल तसे केल्यास नाशिककरांना भीषण पाणीसंकटाचा सामना करावा लागणार अाहे. मराठवाड्याला पाणी साेडल्यामुळे नाशिक शहराच्या पाणी अारक्षणात माेठी कपात झाली. ४६०० दशलक्ष घनफूट पाणी अारक्षण जेमतेम ३५०० दशलक्ष घनफुटांपर्यंत अाले. त्यात दारणामधून ५०० दशलक्ष घनफूट पाणी अपेक्षित असताना, जेमतेम १७० दशलक्ष घनफूटच पाणी मिळाले.
महापालिकेने ३१ जुलैपर्यंत केलेल्या पाणीपुरवठ्याच्या नियाेजनानुसार किमान दारणातून १३० दशलक्ष घनफूट पाणी हवेच अाहे, मात्र दारणात पाणी नसल्यामुळे हे पाणी गंगापूरमधून मिळावे, अशी पालिकेची अपेक्षा अाहे. प्रत्यक्षात असे अारक्षण बदलण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना असल्याचे सांगत जिल्हाधिकारी कार्यालयाने हात वर केले अाहे. त्यामुळे तूर्तास गंगापूर धरणात शिल्लक ३०३ दशलक्ष घनफूट पाणीच हातात असून, महापालिकेचा शहरासाठी प्रतिदिन ३० टक्के पाणीकपातीनंतर हाेणारा १० दशलक्ष घनफूट पाणी वापर बघता केवळ महिनाभर पुरेल इतकेच पाणी अाता गंगापूर धरणात शिल्लक अाहे. त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांची चिंता वाढली असून, पावसाची अाेढ कायम राहिल्यास शहराच्या पाणीपुरवठ्याचे नियाेजन कशाप्रकारे करायचे, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला अाहे.

महापालिका प्रशासन जूनच्या अखेरीस धाे धाे पाऊस पडेल या अपेक्षेवर असून, हातात कमी दिवस असल्यामुळे पाण्याच्या संभाव्य फेरनियाेजनाबाबत काेणी चर्चेसाठी पुढाकार घ्यायचा, असाही पेच अाहे. अातापर्यंत गंगापूर धरणातून २२६६ दशलक्ष घनफूट, तर दारणातून १६६.०१ दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाला अाहे.
बातम्या आणखी आहेत...