आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगाव स्फोटातील जखमी तरुणाचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगाव - सन 2006 मध्ये शहरात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील जखमी लईक अहमद अब्दुल कय्यूम (वय 28) या तरुणाचे बुधवारी निधन झाले. त्यामुळे या घटनेतील मृतांची संख्या 32 झाली आहे. लईक याच्या फुप्फुसात स्फोटातील काही तुकडे घुसले होते.

शहरातील मुशावरत चौक, बडा कब्रस्तानचे प्रवेशद्वार व आतील हमिदिया मशिदीसमोर असे तीन बॉम्बस्फोट झाले होते. यात 31 लोकांचा बळी गेला होता, तर 300 पेक्षा अधिक जखमी झाले होते. त्यापैकीच लईक हा एक आहे. स्फोटातून उडालेले काही तुकडे त्याच्या फुप्फुसात घुसले होते. अत्यंत गुंतागुंत व जिवावर बेतणारा हा प्रकार असल्यामुळे याची शस्त्रक्रियाही घातक समजली जाते. तेव्हापासून लईक मुंबईच्या सिद्धी विनायक रुग्णालयात उपचार घेत होता. सात वर्षांच्या त्याच्या संघर्षाच्या काळात त्याला मधुमेह झाला, यानंतर रक्ताचा कर्करोगही झाला होता. अखेरीस बुधवारी त्याचे निधन झाले.