आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुळ्या बहिणींच्या अॅक्टिव्हाला हायवेवर धडक; एकीला ट्रकने चिरडले, दुसरी जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सटाणा - येथे शिकवणीसाठी अॅक्टिव्हावर जुळ्या बहिणींचा हायवेवर भीषण अपघात झाला. यात एकीला ट्रकने चिरडले असून रुग्णालयात घेऊन जात असताना तिचा मृत्यू झाला. तर दुसरी बहिण रस्त्याच्या कडेला फेकल्या गेली असून ती जखमी झाली आहे.

सटाणा येथे येत असलेल्या वैष्णवी व गीता या जुळ्या बहिणींच्या अॅक्टिव्हाला अज्ञात रिक्षाने कट मारली. तोल गेल्याने दोन्ही बहिणी रस्त्यावर फेकल्या गेल्या. याचवेळी येणारा एक भरधाव ट्रक वैष्णवीच्या उजव्या हात आणि पायावरून गेला. तर दुसरी बहीण ररस्त्याच्या विरुद्ध दिशेला फेकली गेल्याने ती किरकोळ जखमी झाली आहे. वैष्णवीची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी तातडीने नाशिकला हलवण्यात आले. मात्र नाशिक पोहचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. 

वैष्णवी नितीन भावसार (वय १७) व गीता नितीन भावसार ( वय १७) या दोघी जुळ्या बहिणी १२ सायन्सच्या वर्गात शिकत होत्या. आज ११ वाजेच्या सुमारास गणिताच्या शिकवणीसाठी सटाण्याकडे जात असताना हा अपघात झाला. वैष्णविला एक भाऊ असून तिचे वडील आठवडी बाजारात कपडे विक्रीचा व्यवसाय करतात. सटाणा पोलिसांनी अपघातास कारणीभूत असलेला ट्रक व ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे.
बातम्या आणखी आहेत...