आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात संदीप युनिर्व्हसिटीच्या दोन विद्यार्थ्यांना अज्ञात वाहनाने चिरडले; एक ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- संदीप युनिव्हर्सिटीच्या दोन विद्यार्थ्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात एकाचा जागेवरच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर आज (मंगळवार) पहाटे 3 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.

 

 

सूत्रांनुसार, मयूर पाटील जागेवरच मृत झाला असून किरण माळी याला लोकमान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. परंतु त्यातील कोणाचा मृत्यू झाला, याबाबत माहिती मिळाली नाही. मयूर आणि किरणची रायगडला सहल जाणार होती. त्यामुळे पहाटे दोघे रूमवरुन संदीप फाऊंडेशनकडे दुचाकीवरून निघाले असता त्यांना मागून अज्ञात वाहनाने धडक दिली.

 

अपघात झाल्यानंतर रस्त्यावर कोणीच नसल्याने दोघेही सकाळी 6 वाजेपर्यंत घटनास्थळावर भर पावसात पडून होते. दोघांना तत्काळ मदत मिळाली नाही. सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या लोकांनी बघितल्यानंतर जिवंत असलेल्या एकाला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मृत तरुणाला पोलिस आल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलला हलवण्यात आले.

 

किरण माळी हा किनगाव (ता.यावल) तर मयूर पाटील शिरपूर तालुक्यातील भटाणे येथील रहिवासी आहे. दोघेही एमएस्सीच्या पहिल्या वर्षाचे विद्यार्थी आहेत.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... जखमी किरण माळीचे फोटो..

बातम्या आणखी आहेत...