आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद / नाशिक- सामाजिक कार्यकर्ता पारस जैन यांनी नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे शनिवारी दुपारी साडेबारच्या सुमारास आपल्या आठ सहकार्यांसह सुमारे एक हजार फूट लांब तसेच 8 फूट उंचीचा ‘नमोकार तीर्थ’ लिहिलेला जैनधर्मीय पंचध्वज पूर्ण करण्यात यश मिळाले आहे.
नाशिक तालुक्यातील चांदवड येथे नमोकार तीर्थच्या भूमिपूजन सोहळ्यानंतर पारस जैन या 36 वर्षीय तरुणाने सर्वात मोठा पंचरंगी धर्मध्वज उभारली. हा ध्वज एक हजार फूट लांबी आणि आठ फूट उंच होता. नमोकार तीर्थ भूमिपूजन तसेच शिलान्यास कार्यक्रमानंतर ध्वज उभारणीचे काम करण्यात आले. हा ध्वज पन्नास जणांनी मिळून जमिनीपासून 2 फुटांच्या उंचीवर उचलला होता. पारस यांच्या टीममध्ये औरंगाबाद येथील कल्याणी गंगवाल, कोमल गंगवाल, अश्विनी गंगवाल, खुशबू गंगवाल, देवयानी गंगवाल या युवतींचा समावेश होता.
पारस यांनी याआधी एक-दोन नव्हे तर तब्बल सात वेळा वेगवेगळे विक्रम केले आहेत. गेल्या 10 वर्षांपासून ते अँडव्हर्टायझिंग व्यवसायात आहेत. व्यवसायाच्या धावपळीतून त्यांनी समाजसेवेचा वसा जपला आहे. जैन समाजाच्या विविध धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून तसेच तरुण सागर महाराज यांची प्रेरणा घेऊन त्यांनी देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करतात.
नाशिक जिल्ह्यातील मालसाने (ता. चांदवड) नमोकार तीर्थ शनिवारी दुपारी साडेबारा वाजता सर्वात मोठा पंचरंगी धर्मध्वज फडकवणार आहेत. हा ध्वज एक हजार फूट लांबीचा आणि आठ फूट उंचीचा आहे.
आजवर देशभरातील विविध शहरात वेगवेगळे विश्वविक्रम नोंदवून ‘विक्रमादित्य’ ठरलेल्या पारस हे बीएसस्सीपर्यंत शिकले आहेत. गेल्या 10 वर्षांपासून ते अँडव्हर्टायझिंग व्यवसायात आहेत. व्यवसायाच्या धावपळीतून त्यांनी समाजसेवेचा वसा जपला आहे. जैन समाजाच्या विविध धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून तसेच तरुण सागर महाराज यांची प्रेरणा घेऊन त्यांनी देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले. या कार्यक्रमांबरोरच जयपूर अहमदाबाद, नाशिक, औरंगाबाद येथे त्यांनी विविध विश्वविक्रमही केले. ते करत असताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, विविध क्षेत्रातील मित्रमंडळींचे सहकार्य, कुटुंबीयांची भक्कम साथ आणि सतत काही तरी वेगळे करण्याच्या उद्देशाने त्यांनी अडचणीवर मात केली.
आर्थिक अडचणींत थेट मित्रांना मदत करण्याचे आवाहन करत फिनिक्स भरारी घेतली. एकापाठोपाठ एक असे सात विश्वविक्रम करताना त्यांच्या व्यवसायातील कौशल्येही त्यांची कामी आली. हरहुन्नरीपणा, उपजत कल्पकता या स्वभावगुणांना अखंड उत्साह आणि पर्शिमांची जोड दिली. त्यातूनच नवनवीन कल्पनांना मूर्त स्वरूप आले. सायकल मॅरेथॉनसह व सामाजिक उपक्रमातही सहभाग नोंदवतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, एक हजार फूट लांबीचा पंचरंगी धर्मध्वजाबाबत...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.