आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • One Tree Of Mine; Good Initiative By Senior Citizen

एक झाड माझेही; ज्येष्ठांचा स्तुत्य उपक्रम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता शासनस्तरावर अनेक योजना राबविल्या जातात. मात्र, त्यांना फारसे यश येत नाही. पर्यावरणाचे संवर्धन राखण्याकरिता आता ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. मखमलाबाद रोडवरील वडजाई मातानगर येथील नागरिकांनी दोनशे ते तीनशे पर्यावरणपूरक झाडे जगवली आहेत. वडजाई मातानगर येथील जमीन अगोदरपासूनच शेतीपूरक असल्याने येथील नागरिकांनी घरासमोर झाडे लावली. लावलेली झाडे अगदी कमी असल्याने मनपा प्रशासनाच्या मोकळ्या भूखंडामध्ये काही नागरिकांनी झाडे लावली आहेत. येथील रहिवाशांनी येथे केवळ झाडे लावली आणि सोडून दिले असे नाही तर ही झाडे जगविण्यासाठी या परिसरातील महिला, युवक यांचा एक-एक गट रोज पाणी घालतो. त्यामुळे हा भाग पूर्णत: हिरवाईने नटलेला दिसतो. या ठिकाणी एका वर्षात झाडे दहा ते बारा फुटांपर्यंत वाढली आहेत. त्यामुळे येथे पशुपक्ष्यांचा सहवासही वाढला आहे. या भागाची सकाळच पक्ष्यांच्या मंजूळ स्वरांनी होते. संजय ढापसे, पी. एम. सूर्यवंशी, जगन्नाथ शिर्के, विकास क्षेमकल्याणी यांच्यासह परिसरातील महिला, तरुण या झाडांचे संवर्धन करीत आहेत. केवळ आपल्याच दारापुढील नाही तर परिसरातील लावलेल्या सगळ्याच झाडांची येथील ज्येष्ठ नागरिक आणि युवकही काळजी घेतात. त्यामुळे येथील वातावरण आल्हाददायक असते. आता या उपक्रमाचा विस्तार करण्याचे येथील नागरिकांनी ठरवले आहे.