आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निर्यातमूल्य दर लागू होताच कांदा 250 रुपयांनी घसरला; शेतकऱ्यांत संतापाचे वातावरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लासलगाव- केंद्र सरकारने वाढलेले दर पाहून कांद्याचे निर्यातमूल्य ८५० डाॅलर प्रतिटन केले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे भाव सुमारे २५० रुपयांनी घसरले. आता शनिवार-रविवार सलग दोन दिवस सुटी आल्याने सोमवारीदेखील कांद्याला किती भाव मिळतो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मळा घसरण सुरू झाल्याने शेतकऱ्यांत संतापाचे वातावरण आहे. 


लासलगाव बाजार समितीत गुरुवारी लाल कांद्याला तीन हजार ४०० रुपये भाव मिळाला होता. याच दिवशी केंद्र सरकारने कांद्याची भाववाढ पाहून निर्यात होणाऱ्या कांद्यावर ८५०डाॅलर प्रति टन दर लावला. याचाच परिणाम शुक्रवारी लाल कांद्याचे भाव २५० रुपयांनी घसरून सरासरी ३१५० रुपये भाव मिळाला. प्रतिक्विंटल २५० रुपये नुकसान शेतकरीवर्गाला सोसावे लागले. आता इथून पुढे रोज घसरणीला सामोरे जावे लागते की काय अशी भीती शेतकऱ्यांत पसरली आहे. शहरवासियांमध्ये कांद्याच्या दरावरून ओरड सुरू आहे. 

बातम्या आणखी आहेत...