आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांदा निर्यातमूल्य ४२५ डाॅलर प्रतिटन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - केंद्र शासनाने कांदा निर्यात मूल्य २५० रुपयांवरून एकदम ४२५ डाॅलर प्रतिटन इतके केले. एकाच वेळी त्यात १७५ डाॅलर प्रतिटनाने वाढ करण्यात अाल्यामुळे त्याचा निर्यातीवर विपरीत परिणाम हाेईल. अशा स्वरूपाच्या निर्णयाबाबत अाठ दिवसांपासून विचारविनिमय सुरू हाेता. ताे शुक्रवारी जाहीर करण्यात अाला. त्यातच भारतात पाकिस्तानचा कांदा आयात हाेत असल्यानेही उत्पादक शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे. या दाेन्हींचा परिणाम देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे दर घसरण्यावर हाेईल. त्यामुळे उत्पादकांना माेठा अार्थिक फटका सहन करावा लागणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...