आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात कांद्याला भाव मिळत नसल्याने कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - देशात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या आणि कर्जमाफीवरून आश्वासने व आंदोलने सुरू असताना आणखी एका कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील ढेकू गावात ही घटना घडली आहे.
 
शिवाजी गंगाधर सूर्यवंशी असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी शेतात विषारी औषध सेवन करून आपले आयुष्य संपवले. कांद्याला कमी भाव मिळाल्याने सूर्यवंशी नाराज होते. त्यांच्यावर 2.25 लाखांचे मध्यम मुदत व 80 हजार रुपयांचे पीक होते. मालाला भाव मिळत नसेल तर, कर्ज कसे फेडणार या चिंतेने ग्रस्त असलेले सूर्यवंशी यांनी आत्महत्या केली. 
 
बातम्या आणखी आहेत...