आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिऱ्यापाठाेपाठ कांदा बाजारही गुजरातला, लासलगाव मागे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून ओळख असणारे लासलगाव आता कांद्याच्या व्यापारात मागे पडत आहे, तर गुजरातसह बंगळुरू बाजारपेठांनी कांदा व्यापारात आघाडी घेतली आहे. विशेष म्हणज कांदा उत्पादन आणि व्यापार यात महाराष्ट्राची एकाधिकारशाही मोडीत निघत असताना लासलगावपेक्षा नेवासे, राहाता, पिंपळगाव, सोलापूर आणि पुणे ही कांदा मार्केट‌्स बाजी मारत आहेत. विशेष म्हणजे अनेक क्षेत्रातील उद्योग गुजरातकडे आकर्षित होत असताना महाराष्ट्राचा कांदाही आता गुजरातकडे वळला असल्याचे चित्र आहे.

कमी पावसात आणि कमी कालावधीत लहान शेतकऱ्याच्या हातात हक्काचा पैसा मिळवून देणारे पीक म्हणून शेतकऱ्यांची कांद्याला मोठी पसंती असते. त्यात नाशिकच्या लासलगाव बाजारपेठेचा मोठा बोलबाला असतो. लासलगावने आशिया खंडातही कीर्ती मिळवली आहे. मात्र गेल्या काही महिन्यांतील आकडेवारीने लासलगावच्या या साम्राज्याला छेद दिला आहे.

गेल्या सहा महिन्यांमध्ये जून वगळता देशातील बाजारपेठांपैकी अव्वल ५ क्रमांकांमध्ये लासलगावचा समावेश नाही. राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन, विकास फांउडेशनच्या आकडेवारीनुसार या वर्षात मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यात गुजरात मधील माहुवा बाजारपेठ आघाडीवर राहिली. तर जून, जुलै आणि ऑगस्ट मध्ये बंगलुरू मार्केटमध्ये कांद्याचा सर्वात जास्त व्यापार झाला. मार्च महिन्यात सर्वाधिक आवक गुजरातमधील माहुवा बाजारात (८.४९ लाख क्विंटल) झाली. त्या खालोखाल बंगलुरू (४.४४ लाख क्वि), पुणे (४.०५ लाख क्वि), सोलापूर (३.७५ लाख क्वि) आणि भावनगर (२.४३ लाख क्वि) कांद्याची आवक झाली. त्या महिन्यात लासलगावमध्ये फक्त १.८८ लाख क्वि. कांदा आला .

आडत बंदचा लासलागावला फटका :
जुलैपासून अाडतीच्या मुद्द्यावरून नाशिकचे कांदा मार्केट बंद असल्याने कांद्याची आवक प्रचंड घटली. ऑगस्ट महिन्यात राज्यात सर्वाधिक आवक पुण्यात(१.२७)लाख क्विंटल झाली. त्या खालोखाल पिंपळगाव (१.२० ) राहता ९७ हजार क्विंटल, राहुरी ९८ हजार क्विंटल, सोलापूर ७७ हजार क्विंटल आणि येवला ६९ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली.

क्विंटलमागे ४०० रुपये अनुदान मिळावे :
- देशांतर्गत बाजारात खूप कांदा साचून असल्याने नाशिकच्या कांद्याला भाव मिळत नाही. शेतकऱ्यांचे नुकसान होत असून त्यांना प्रति क्विंटल ४०० रुपये अनुदान मिळावे अशी मागणी आपण केंद्राकडे केली आहे. : जयदत्त होळकर , सभापती, लासलगाव कृउबा समिती.
- केंद्राने अनुदानाचा चेंडू राज्याच्या कोर्टात ढकलला आहे. अनुदानाचा प्रस्ताव राज्याच्या पणन मंत्र्यांनी केंद्राकडे पाठवावा असे केंद्राने सांगितले आहे. : नानासाहेब पाटील, माजी सभापती, लासलगाव कृउबा समिती.
अव्वल ५ बाजारपेठांतील आवक, गुजरातची आघाडी
मार्च ते ऑगस्ट २०१६ या काळातील आकडेवारीवर नजर टाकली असता, जूनपर्यंत गुजरातच्या माहुवाने आघाडी घेतली, तर जूनपासून बंगळुरूने आघाडी घेतली. नेवासा, राहाता, पुणे या मार्केट मध्येही कांद्याची मोठी आवक झाली. जून आणि ऑगस्टमध्ये लासलगावच्या दुप्पट कांदा नेवासे मार्केटमध्ये आला. जुलैमध्ये बंगळुरू,दिल्ली यांच्यापाठोपाठ राहाता, नेवासे आणि पुणे या मार्केटमध्ये कांद्याची सर्वात जास्त आवक झाली.

आवक घटली, भावही सहापटीने गडगडले : लासलगावात आवक घटली, भावही कोसळले. ६ महिन्यात ऑगस्टमध्ये येथे सर्वात कमी २८५ रु. क्विंटल, २ रुपये ८५ पैसे किलो असा भाव आला. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे भाव तब्बल सहा पटीने घसरले आहेत.

जुलै २०१६
बंगलोर - ४.५२
दिल्ली - ३.२७
रहाता - २.८८
नेवासे - २.६३
पुणे - २.०३
ऑगस्ट २०१६
बंगलोर - २.५०
नेवासे -३.१२
दिल्ली - १.२९
पुणे - १.२७
पिंपळगाव -१.२०
(कांदा आवक लाख क्विंटलमध्ये)
बातम्या आणखी आहेत...