आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Onion News In Marathi, Lok Sabha Election, Nashik, Divya Marathi

निवडणुकीत कांदाच ठरणार निर्णायक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - राज्यासह देशात कांदा उत्पादकांची संख्या मोठय़ा प्रमाणावर आहे. तसेच कांदा दरात घसरण झाल्यावर उत्पादकांना वाहतूक खर्चही परवडत नसल्याने आक्रमक होऊन आंदोलनाचे हत्यार बाहेर काढले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी सटाणा येथे आंदोलन केले. दरात अशीच परिस्थिती राहिली तर शेतकरी मतदानावर बहिष्कार टाकण्याची चर्चा करू लागले आहेत.


नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा 200 ते 300 रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाला. पूर्वीच गारपिटीमुळे नुकसान झाले, शासनाची मदत नाही आणि दरही कमी त्यामुळे कांदा उत्पादकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. नाशिक जिल्ह्यात सध्या लाल कांदा संपला असून, उन्हाळ कांदा बाजारात येत आहे. मात्र, सर्वच कांदा खराब नाही. मात्र त्या कांद्यालाही कमी दर मिळत आहे. सटाणा, सिन्नर, देवळा, मालेगाव आणि चांदवड तालुक्यात उन्हाळ कांद्याची लागवड अधिक प्रमाणात करण्यात आली आहे. तसेच उन्हाळ कांदा आता काढणीला असल्याने त्याची बाजार समितीमध्ये आवक वाढणार आहे. त्यामुळे दरात घसरण झाली तर त्याचा नक्कीच निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


सरकार स्थिर आणि अस्थिर ठेवण्यात कांदा हा प्रमुख मुद्दा ठरत आला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सध्या कांद्याला मिळणारा अल्प दर पक्षांसह उमेदवाराचे अस्तित्व ठरविण्यासाठी निर्णायक स्थितीमध्ये आला आहे. गारपिटीमुळे कांदा खराब झाल्याने बाजारात 25 पैसे किलोने विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.


कष्टाचा मोबदला तरी किमान द्या
शासनाकडून नेहमी शेतकर्‍यांवर अन्याय केला जातो. आम्ही मदतही मागत नाही. निदान आमच्या कष्टाचा मोबदला मिळाला पाहिजे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये आमच्या पाच ते सहा गावांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचे नियोजन केले आहे. सर्व मिळून हा निर्णय घेऊन प्रशासनाला धडा शिकविण्याचा प्रयत्न आहे. चंद्रकांत गायकवाड, उसवाड


आम्ही मतदान केल्याने कांद्याचे भाव वाढतील?
काद्याला भाव मिळत नाही येथे आम्हाला आमचेच जगणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे मतदान करून थोडेच कांद्याचे भाव वाढणार आहेत. सुभाष निकम, दाभाडी, मालेगाव