आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Onion Parcel Speed Posted To Agriculture Minister

कृषिमंत्र्यांना स्पीड पोस्टने कांदा पार्सल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : जय किसान फार्मर्स फोरमच्या वतीने कृषिमंत्र्यांना पार्सल पाठविताना न्याहारकर.
लासलगाव - कांद्याचे निर्यातमूल्य ४२५ डॉलर प्रति टन केल्याने कांद्याच्या भावात घसरण होत असल्याने जय किसान फार्मर्स फोरमच्या वतीने केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांना कांद्याचे पार्सल स्पीड पोस्टाद्वारे शुक्रवारी विभागीय अध्यक्ष निवृत्ती न्याहारकर यांनी पार्सल पाठविले. कांद्याच्या निर्यातमूल्यात मोठी वाढ केल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. तीन महिने कांदा चाळीत साठवून ठेवल्याने त्याचे वजन घटले आहे. त्यातच भविष्यात कांद्याचे भाव वाढतील, या शक्यतेने केंद्राने हा चुकीचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी पाठविलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. निर्यातमूल्य वाढविल्याने कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली असून, निर्यातमूल्य वाढविण्याची वेळ चुकीची असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले अाहे.
केंद्र शासनाचा निर्णय शेतकरीविरोधी
निसर्गाचीसाथ नसतानाही कसाबसा कांदा चाळीत साठवला. त्याचे वजन घटत असताना केंद सरकार निर्यातमूल्य वाढवते, ही शेतकरीविरोधी भूमिका सरकारची आहे. जी थोडी आशा कांद्याच्या बाबतीत होती, ती या निर्णयमुळे फोल ठरणार आहे. प्रा.संजय जाधव
सरकारने विचार करून निर्णय मागे घ्यावा
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसत आहे. त्यामुळे कांद्याची हालत काय आहे, हे शासनास कळावे म्हणून कांदे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. हे कांदे पाहून सरकार आपला निर्णय मागे घेईल, अशी आशा करूया. निवृत्तीन्याहारकर, विभागीय अध्यक्ष
जय किसान फार्मर्स फोरमच्या वतीने कृषिमंत्र्यांना पार्सल पाठविताना न्याहारकर.