आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिनाभरात कांदा हजाराने घसरला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - कोलकाता, दिल्ली, गुजरात आणि राजस्थानमधील कांदा विक्रीसाठी बाजारात येत असल्याने दरात एक हजार रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे शेतक-यांसह कांदा व्यापा-यांना तोटा येत आहे. ज्या व्यापा-यांनी अधिक दराने कांदा खरेदी करून ठेवला होता त्यांना दिल्ली, कोलकाता, आदी शहरांमध्ये दर मिळत नसल्याने तोट्यात व्यवसाय करावा लागत असल्याचे नाशिक जिल्हा कांदा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी यांनी सांगितले.

जानेवारी महिन्यात लाल कांद्याची आवक कमी झाल्याने दर अडीच हजार रुपयांवर गेले होते. मात्र सध्या महाराष्ट्रात उन्हाळी कांदा आणि राजस्थान, गुजरात आणि कोलकाता या ठिकाणचाही कांदा बाजारात आल्याने कांद्याचे दर कोसळले आहेत. कांदा परिपक्व होण्यापूर्वीच विक्रीसाठी आणला जात असल्याने दरात घसरण होत असल्याची व्यापारी वर्तुळात चर्चा आहे. उन्हाळी कांदा आणि कोलकाता भागातील सुखसागरचा कांदा बाजारात आल्याने परराज्यात कांद्याची आवक वाढली आहे. त्यामुळे शेतक-यांसह व्यापा-यांना तोटा सहन करावा लागत असल्याचे कांदा व्यापारी पप्पू पटेल यांनी सांगितले.
असे घसरले दर (दर प्रतिक्विंटल)
7 फेब्रुवारी रू 1850
9 फेब्रुवारी रू 1650
12 फेब्रुवारी रू 1400
17 फेब्रुवारी रू 1300
19 फेब्रुवारी रू 1475
24 फेब्रुवारी रू 1150
28 फेब्रुवारी रू 950
4 मार्च रू 801