आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कांद्याचे दर ऐंशीच्या घरात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - कांद्याच्या वाढत्या दराने लोकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. नाशिकच्या किरकोळ बाजारात कांद्याची प्रतिकिलो 60 ते 70 रुपये दराने विक्री होत आहे, तर मुंबईत 80 रुपये प्रतिकिलोचा भाव सुरू आहे. मंगळवारी पिंपळगाव बाजार समितीत प्रतिक्विंटल 3 हजार 51 ते 4 हजार 951 रुपये दराने कांद्याची विक्री करण्यात आली. सरासरी दर 4 हजार 400 रुपये होता.

साठवून ठेवलेला कांदा आद्र्रतेमुळे खराब होत असून वजनही कमी होत आहे. बाजारातील कांद्याची आवक मंदावली आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास कांद्याचा भाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दर वाढीमुळे ग्राहकांनी कांदा खरेदीकडे पाठ फिरवली आहे. मागणी घटल्यामुळे व्यापार्‍यांमध्येही भीतीचे वातावरण तयार झाले आहे. आवक घटली असली तरी चांगला भाव मिळेल की नाही याची शाश्वती नसल्याचे मत शेतकर्‍यांनी व्यक्त केले आहे. मागील काही दिवसात कांद्याच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे.