आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इजिप्त, पाकिस्तानातून अायात कांदा मुंबईत,दाेन वर्षांनंतर प्रथमच सहा हजारांचा टप्पा पार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासलगाव, नाशिक - अाशिया खंडातील कांद्याची सर्वात माेठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या घाऊक भावाने अाजपर्यंतचे सर्व उच्चांक माेडीत
काढले. शुक्रवारी झालेल्या लिलावांदरम्यान इतिहासात प्रथमच ६१५१ रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला. नांदगावमध्ये तर ताे ६३५० रुपयांवर पाेहाेचला.
सोलापुर बाजारात तर कांद्याला प्रति क्विंटल ७ हजार ४०० रुपये दर मिळाला. दोन वर्षांपूर्वी म्हणजे अाॅक्टाेबर २०१३ मध्ये लासलागाव समितीमध्ये ६०७१ रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला हाेता. ताे उच्चांकदेखील माेडला गेला. यामुळे किरकाेळ बाजारात कांदा सरासरी ७५ रुपये किलाेपर्यंत पाेहाेचणार अाहे. दरम्यान, इजिप्त आणि पाकिस्तानातून अायात झालेला सुमारे ५५० टन कांदा मुंबई बंदरामध्ये दाखल झाला. तो बाजारात आल्यावर सोमवारी दर
काहीसे कमी हाेतील, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

७५ रुपये किलो भाव
उत्पादकांजवळील कांदा संपत आल्याने बाजार समितीतील आवक घटली आहे. शुक्रवारी लासलगाव बाजार समितीमध्ये ४,५८५ क्विंटल आवक झाली होती. परंतु त्यातील केवळ २० ते २५ टक्केच कांदा चांगला हाेता. त्यामुळे सर्वाधिक भाव ६,१५१ रुपयांवर पाेहाेचला. घाऊक बाजारातील या दरवाढीचा परिणाम किरकाेळ बाजारातील दरांवर झाला असून तेथेे साधारण कांदा ६५ रुपये, तर चांगला कांदा ७५ रुपये प्रतिकिलाे दराने विकला जात अाहे.