आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रावणातही कांदा दराचा प्रवास होतोय तेजीकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - व्रतवैकल्यांचा महिना असलेल्या श्रावणात मांसाहार आणि लसूण, कांदा वज्र्य केला जातो. धार्मिकता पाळतात, त्यामुळे त्यांची मागणी कमी होते. आणि त्यामुळे श्रावणात कांद्याचे भाव कधीही वाढत नाहीत. या नियमाला यावर्षीचा हा हंगाम अपवाद ठरला आहे. देशांतर्गत मागणी व पुरवठय़ाचा ताळमेळ घातला जात नसल्यामुळे नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याचा पुन्हा तेजीकडेच होत आहे. गत आठवड्यात घाऊक बाजारात 3 हजार 500 रुपयांपर्यंत घसरलेले भाव गुरुवारी पुन्हा जिल्हयातील सर्वच बाजार समित्यांमध्ये 4 हजार रुपयांवर पोहोचले. पिंपळगाव बाजार समितीत सर्वाधिक दर 4 हजार 516 रुपये दर मिळाला. परिणामी सध्या नाशिक शहरातील किरकोळ बाजारात 40 रुपये प्रतिकिलो दराने कांदा विक्री होत आहे.

किरकोळ बाजारात कांदा प्रतिकिलो 60 ते 80 रुपये दराने मिळू लागल्याने खडबडून जागे झालेल्या शासनाने दर आवाक्यात रहाण्यासाठी साठवणूक करणार्‍या व्यापार्‍यांवर कारवाई करण्याचे अस्त्र उपसले. त्यामुळे व्यापार्‍यांनी कमी खरेदीचा मार्ग स्वीकारला. त्यामुळे बाजारसमितीत कांदा आवक वाढली आणि दर घसरले. त्यामुळे शेतकरी हे रस्त्यावर उतरले होते. व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांना टप्प्याटप्याने कांदा आणण्याचे आवाहन शेतकर्‍यांना केल्याने दरात सुधारणा होण्याची शक्यता राहील, त्यानुसार बुधवारपासून दरवाढ होत असल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र किरकोळ बाजारात कांदा दर वाढले तर पुन्हा शासन कांदा दर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्नशील रहाणार आहे.


ढगाळ हवामानामुळे चिंता
जिल्ह्यात चार ते पाच दिवस हवामान ढगाळ राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असल्यामुळे साठवणूक केलेला कांदा खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


ग्राहक करतात भांडणे
बाजारात दर वाढले तर ग्राहक आमच्याशीच वाद घालतात.त्यामुळे कांदा विक्री करताना विचार करावा लागत आहे. सचिन चवळे, किरकोळ विक्रेता