आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्यातमूल्य घटवले; कांद्याचे दर वाढणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कांद्याचे आंदोलन पेटू नये तसेच शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी नाशिक दौरा आटोपताच बुधवारी दुपारी वाणिज्यमंत्री आनंद शर्मा यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर कांद्याचे निर्यातमूल्य 350 वरुन 150 डॉलर प्रतिटन करण्यात आले आहे. गुरुवारी याबाबत अधिसूचना काढण्यात येणार आहे. या निर्णयानंतर भारतीय कांद्याचे निर्यातमूल्य इतर देशांच्या तुलनेत कमी झाल्याने निर्यातीत वाढ होऊन दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
कांद्याच्या दरात होत असलेल्या घसरणीमुळे शेतकर्‍यांनी आंदोलने करून निर्यातमूल्य रद्द करण्याची मागणी केली होती. नाशिकमध्ये झालेल्या राष्ट्रवादी भवनाच्या उद्घाटन सोहळ्यात पवार यांनी दिल्लीत जाऊन निर्यातमूल्य रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. मनमाड येथील क्रांतिवीर व्ही.एन. नाईक जन्मशताब्दी समारोपानंतर पवार दुपारी विमानाने कांदाप्रश्नी बैठकीसाठी दिल्लीला रवाना झाले होते.