आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांदा, टोमॅटोचे भाव पडले, बटाटा अन् लसूण महागला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक : नोटबंदीनंतर गेल्या महिनाभरात सर्वच बाजार समित्यांमध्ये झालेले बदल वेगवेगळ्या स्तरावर नोंदले गेले आहेत. राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन आणि विकास
संस्थेच्या आकडेवारीनुसार, देशभरात कांदा आणि टोमॅटो या दोन्ही पिकांचे भाव नोव्हेंबर २०१५ च्या तुलनेत खाली आलेले दिसतात, तर बटाटे आणि लसूण या पिकांची आवक जास्त असूनही त्यांचे भाव वाढलेले दिसतात.
यामागे या पिकांचे वाढलेले उत्पादन, घटलेली निर्यात आणि नोटबंदी या तिन्हीचा एकत्रित परिणाम असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. पुढल्या काळात कांद्याचे भाव आणखी १०० ते १५० रुपये क्विंटलने खाली येण्याची शक्यता त्यांनी मांडली आहे.
गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये देशातील सर्व बाजार समित्यांमध्ये ७५ लाख २८ हजार ३९ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. त्यावेळी कांद्याचे भाव २ हजार १३९ रुपये क्विंटल होते. मात्र, यंदा नोव्हेंबर २०१६ मध्ये कांद्याची आवक कमी म्हणजे ७३ लाख १२ हजार ८४ एवढी कमी होऊनही भाव तिपटीने पडलेले दिसतात. तीच गत टोमॅटोच्या बाबतीतही दिसते. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात देशाच्या बाजारात १७ लाख क्विंटल टोमॅटोची आवक झाली होती. त्यावेळी
टोमॅटोला १ हजार रुपये क्विंटल भाव मिळाला होता. यंदा मात्र टोमॅटोचे भाव ८०७ रुपयांच्या खाली आलेले आहेत.

बटाटा आणि लसूण या दोन पिकांबाबत गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक माल बाजारात येऊनही भाव वाढलेले दिसतात. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये २७ लाख ६२ हजार ७८७ क्विंटल बटाटा बाजारात आला. त्यापेक्षा यंदा जास्त म्हणजे ३० लाख ५९ हजार ७३७ बटाटा बाजारात आला. मात्र, गेल्या वर्षीच्या ८७३ रुपये क्विंटल या भावात यंदा वाढ होऊन सरासरी भाव १ हजार २५ रुपये क्विंटल असा पडला.
लसूणाबाबतची आकडेवारीही हेच सांगते. गेल्या वर्षी देशात २ लाख ६ हजार ३९२ क्विंटल लसणाची अावक झाली होती. त्याला ७,६६१ रुपये क्विंटल असा भाव मिळाला होता. यंदा लसणाची अावक वाढून ३० लाख ३० हजार ३७८ झाली असली तरी भावही ८,३४२ असे वाढलेले दिसतात.
सामान्यपणे जास्त आवक झाली की भाव पडतात आणि कमी आवक झाली की भाव वाढतात. या बाजाराच्या अर्थशास्त्रीय नियमाच्या विपरीत हे भाव दिसतात. मात्र, नोटबंदीचा या भावाच्या चढउतारावर विशेष परिणाम झाला नाही, असे मत एनएचआरडीएचे उपसंचालक एस. पी. शर्मा यांनी सांगितले.
‘खरिपाचा कांदा फक्त महाराष्ट्रात होतो, मात्र लेट खरीप उत्तरेतील राज्यांत होतो. त्यामुळे लवकरच तो बाजारात दाखल होईल. त्यात कांद्याची निर्यात कमी झाल्याने स्थानिक बाजारात मोठ्या प्रमाणात कांदा साठून राहील आणि आगामी काळात जानेवारी ते मार्च दरम्यान कांद्याचे भाव अजून १०० ते १५० रुपयांनी खाली येण्याची शक्यता आहे,’ असा अंदाज नाफेडचे उपाध्यक्ष चांगदेवराव होळकर यांनी व्यक्त केला.
आवक (क्विंटल) दर (रुपयांत)
वर्ष नोव्हेंबर २०१५ नोव्हेंबर २०१६ नोव्हेंबर २०१५ नोव्हेंबर २०१६
कांदा ७५,२८,०३९ ७३,१२,०८४ २,१३९ ८,५२
लसूण २,०६,३९२ ३,३०,३७८ ७,६६१ ८,३४२
बटाटा २७,६२,७८७ ३०,५९,७३७ ८,७३ १,०२५
टोमॅटो १७,००,००० १९,०९,०१७ १,४०० ८,०७
(संदर्भ – राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन आणि विकास संस्था
बातम्या आणखी आहेत...