आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कांद्याने खाल्ला भाव;प्रतिक्विंटलमागे २०० रुपयांनी झाली वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जिल्ह्यातीलबाजार समितीमध्ये लाल कांद्याची आवक निम्म्याने कमी झाल्याने दरात प्रतिक्विंटलमागे २०० रुपयांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे लहान कांद्याला (गोलटी) बांगलादेशात अधिक मागणी वाढल्याने गोलटीचे दर १२०० ते १३०० रुपये प्रतिक्विंटल आहे. कांद्याचे दर सरासरी १४०० ते १४५० रुपये आहे. यामुळे शेतक-यांना दिलासा मिळाला आहे.
नाशिक जिल्ह्यातील लाल कांदा हा आकर्षक दिसत असल्याने त्याला मागणी मोठ्या प्रमाणात असते. मात्र, हा कांदा अधिक काळ टिकत नसल्याने व्यापारी वर्ग तो साठवत नाही. त्यामुळे मागणीनुसार लाल कांद्याचे दर ठरतात. सध्या काेलकाता, दिल्ली, पाटणा, कानपूर आणि बांगलादेशामध्ये लाल कांदा आणि गोलटीची अधिक मागणी वाढली अाहे. बाजार समितीमध्ये येणा-या कांद्याची आवक घटली असल्याने दरात वाढ होत आहे. मार्च महिन्यात उन्हाळ कांदा बाजारात येण्यास सुरुवात होते. ज्या प्रमाणात लाल कांद्याची आवक घसरत जाईल, त्या प्रमाणात दरात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र दर वाढल्यावर केंद्राने हस्तक्षेप करू नये, ही कांदा उत्पादकांची इच्छा आहे. ज्यावेळी कांद्याचे दर कमी होतात, त्यावेळी केंद्र सरकार काहीही करीत नाही. मात्र, दर वाढल्यावर ते कमी होण्यासाठी निर्यातबंदीसारखे निर्णय घेत असल्याने कांदा उत्पादकांमध्ये अशा निर्णयामुळे संताप निर्माण होत आहे. सध्या नाशिक, लासलगाव, पिंपळगाव, सटाणा, दिंडोरी, नायगाव, सायखेडा, सिन्नर, येवला बाजार समितींमध्ये लाल कांद्याची आवक निम्म्या वाहनांवर आली आहे. त्यामुळे येथे व्यवहार काही प्रमाणात ठप्प झाले आहेत.

दर स्थिर राहणार
लालकांद्याची आवक कमी झाली असल्याने दरात वाढ झाली आहे. मात्र, उन्हाळ कांदा येईपर्यंत लाल कांद्याचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे. इम्तियाजपटेल, कांदा व्यापारी

निर्यातबंदी करू नये
लालकांद्याची आवक घटल्याने कांदा दरात वाढ होईल. मात्र, केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी लागू करून त्यामध्ये आडफाटा आणू नये. निवृत्तीन्याहारकर, कांदा उत्पादक